जिल्हा परिषद कडील शाळांच्या 2025 सुट्टी यादीमधील दिवाळी सुट्टी मध्ये बदल करणे बाबत divali festival holidays
संदर्भ – 1. इकडील जाक्र कोजिप/शिक्षण/137/2025 दि.25/01/2025 सन 2025 चे सुट्टीचे परिपत्रक.
2. कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांचे दिनांक 04/08/2025 चे निवेदन.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार संदर्भ 1 अन्वये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या सालाकरिता प्राथमिक शाळांना दयावयाच्या शैक्षणिक सुटया मध्ये दिपावली सुट्टी ही दि. 13/10/2025 ते दि. 28/10/2025 पर्यत (एकुण 11 दिवस) देणेत आलेली आहे. त्यामध्ये अर्शता बदल करणे संदर्भात उपरोक्त संदर्भीय क्र. 2 अन्वये निवेदन प्राप्त झालेले आहे. त्या अनुषंगाने दिपावली सुट्टीमध्ये अंशता बदल करणेत आलेला आहे. सदरची दिपावली सुट्टी दि. 16/10/2025 ते दि.31/10/2025 पर्यत (एकुण 11 दिवस) सुट्टी देण्यात आलेली आहे. सुट्टीनंतर दि.01/11/2025 पासुन शाळा सुरु करणेत यावी. सदर बदलाची नोंद सर्व गट शिक्षणाधिकारी व सर्व जिल्हा परिषद शाळांनी घेवून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी.
तरी तुम्ही तुमच्या स्तरावरुन सर्व शाळांना कळविण्यात यावे.










