शालेय सहलींसाठी फक्त लालपरी; खासगी बस नको विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा educational trip 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय सहलींसाठी फक्त लालपरी; खासगी बस नको विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा educational trip 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शालेय सहलीसाठी स्कूल बस किंवा खासगी वाहनांचा वापर झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे शाळांच्या सहली आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसनेच (एसटी) कराव्या लागणार आहेत. राज्यातील शालेय सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सहल म्हणजे खरे तर शालेय जीवनात हसतखेळत नव्या गोष्टींचे ज्ञान मिळवणे, नव्या ठिकाणांना भेटी देणे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळवून देणे हा उद्देश असणे गरजेचे आहे. परंतु शाळांच्या सहलींसाठी बहुतांश वेळा वॉटर पार्क, रिसॉर्ट्स, बागबगिचे आदींना प्राधान्य दिले जायचे. यामध्ये बदल करण्यात येऊन शाळांच्या सहली आता ऐतिहासिक स्थळांकडे नेण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाला काढले आहेत.

आरटीओ’ला कारवाईचे निर्देश

शालेय सहलीदरम्यान खासगी बसमधून प्रवास करताना सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. काही ठिकाणी अपघातही घडल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर केवळ एसटी महामंडळाच्या बसचा पर्याय वापरावा असे सांगण्यात आले आहे. आता नियम मोडणाऱ्या शाळा तसेच वाहनमालकांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

एसटी भाड्यात ५० टक्के सवलत

शासकीय शालेय सहलींसाठी एसटी महामंडळाकडून नव्या आणि सुरक्षित बस उपलब्ध करून देण्यात येत असून भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. यामुळे शाळांना आर्थिक दिलासा मिळत आहे.

तिजोरीत दहा कोटींचा महसूल

नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसच्या माध्यमातून १० कोटी ८५ लाख रुपयांचा महसूल एसटी महामंडळाला मिळाला, खासगी शाळांना मात्र सवलती देण्याबद्दल अद्याप निर्णय नाही.

Related posts:

Leave a Comment