घरभाडे भत्ता अदा करणे बाबत gharbhade bhatta
संदर्भ-
१. संचालनालयाचे पत्र शिसंमा/२५/२६/टी-७/शालार्थ/६०४२/दि.१३/०२/२०२६
२. शासन निर्णय वित्त विभाग क्र. मभवा-१३२४/प.क्र-३४/सेवा-०९/दि.२५/०२/२०२५
विषयांकित प्रकरणी संदर्भ ०१ नुसार वाढीव घरभाडे भत्त्ता बाबत शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त पुर्णतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा/ तुकडया/कमवि / सैनिकी शाळावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वाढीव घरभाडे भत्ता देयक व नियमानुसार देय घरभाडे भत्त्ता थकबाकी माहे फेबुवारी २०२६ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.










