घरभाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करून देणेबाबत gharbhade bhatta paripatrak
संदर्भ- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण-१०२५/प्र.क. १०८/टिएनटी-३ दि. १२/१२/२०२५
उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार माहे जूले २०२४ पासून महागाई भत्ता ५० टक्के वरून ५३ टक्के घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे संदर्भ क्र. १ अन्वये सातव्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ५ फेब्रुवारी, २०१९ अन्वये महागाई भत्त्याची रक्कम ही ५० टक्के पेक्षा अधिक झाल्यामुळे बाढीव दराने घरभाडे भत्ता देय ठरतो.
वित्त विभाग शासन निर्णय क्र. मभवा १३२४/प्र.क्र.३४/सेवा/-९ दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार घरभाडे भत्ता थकबाकी (HRA Arrears) टॅब शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.









