राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्याबाबत international yoga day celebration
वाचा :
१) शासन परिपत्रक क्रमांकः उपक्रम-२३१५/प्र.क्र.१४५/एसडी-४, दिनांक १७ जून, २०१५. १
२) सचिव, आयुर्वेद योग व प्राकृतिक चिकित्सा, युनानी, सिध्द एवं होमियोपथी (आयुष) मंत्रालय, नवी दिल्ली यांचे क्र. डीओ नं. एस-११०१२/६/२०१६-आयइसी, दिनांक २९.०३.२०१६ चे पत्र.
३) सह सचिव, आयुर्वेद योग व प्राकृतिक चिकित्सा, युनानी, सिध्द एवं होमियोपथी (आयुष) मंत्रालय, नवी दिल्ली यांचे क्र. डीओ नं. एस-११०१२/३४/२०१६-आयइसी, दिनांक २४.०५.२०१६ चे पत्र.
प्रस्तावना :
संयुक्त राष्ट्रसंघाने “२१ जून” हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केलेला आहे. ५००० वर्षाहून अधिक परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारिरीक आणि आत्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यिभूत आहे. दुसऱ्या जागतिक योगा दिनाचे आयोजन दि.२१.०६.२०१६ रोजी करण्यात येणार आहे. या संदर्भात करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने सचिव, आयुर्वेद योग व प्राकृतिक चिकित्सा, युनानी, सिध्द एवं होमियोपथी (आयुष) मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त दि.२९.०३.२०१६ च्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. सदर दिवशी व्यापक योगाच्या प्रात्यक्षिकांचा मुख्य कार्यक्रम सकाळी ७ ते ८ या कालावधीमध्ये करण्यात येणार असल्याचे व त्यानंतर सामुहिक योगा कार्यक्रमाचे (Common Yoga Protocol) आयोजन ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर करावयाचे प्रस्तावित आहे. या संदर्भात योगा उत्सव, चर्चासत्र, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम इ. चे आयोजन शाळा, महाविद्यालये, विद्यापिठे यामधील विद्यार्थ्यांकडून तसेच एन.एस.एस., नेहरु युवा केंद्र इ. युवा संघटनांमार्फत योगा संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाचा तपशिल www.ayush.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन हे एक दिवसापुरते प्रतिकात्मक न राहता राज्यातील प्रत्येक गावामध्ये योगविद्येचा प्रसार व विकास कायमस्वरुपी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेस योग दिवस साजरा करणे तसेच राज्यामध्ये योगाचा प्रसार व जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रतिवर्षी दिनांक १२ ते २६ जानेवारी या कालावधीत ५ दिवसांच्या योगा उत्सवाचे (Yoga Festival) आयोजन करण्यास मान्यता देण्याची व त्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः
उपरोक्त पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेस योग दिवस साजरा करण्यास तसेच राज्यामध्ये योगाचा प्रसार व जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रतिवर्षी दिनांक १२ ते २६ जानेवारी या कालावधीत ५ दिवसांच्या योगा उत्सवाचे (Yoga Festival) आयोजन करण्यास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालये यामध्ये योगविद्येचा प्रसार व विकास करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्यास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे.
समितीची कार्यकक्षा :
१. प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे.
२. गाव पातळीपर्यंत योग विद्येचा प्रसार होण्याच्या दृष्टीने खाजगी योग प्रसार करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधून संबंधित प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे, चर्चासत्र, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम इ. चे आयोजन करणे,
३. जिल्हयातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेस योग शिक्षण संदर्भातील कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे.
४. गाव पातळीपर्यंत योगाचा प्रसार व जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रतिवर्षी दिनांक १२ ते २६ जानेवारी या कालावधीत ५ दिवसांच्या योगा उत्सवाचे (Yoga Festival) आयोजन करण्याच्या दृष्टीने उपाय योजना करणे.
५. स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या साहित्यामधून योगासाठी लागणाऱ्या मॅटस् व अन्य साधनांचा वापर करणे.
६. योग विषयक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विकलांग / दिव्यांग व्यक्तींचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने उचित कार्यवाही करणे.
समितीचे अध्यक्ष आवश्यकतेनुसार तज्ञ व्यक्ती व अन्य मान्यवरांना निमंत्रित करु शकतील.
समितीची कार्यकक्षा :-
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये योगाचा प्रसार व विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समित्यांकडून करण्यात येत असलेल्या कामाचे संनियंत्रण करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, आवश्यकतेनुसार धोरणात्मक निर्णय घेणे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०६१०१२४२२९१५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Happy yoga day!