जुनी पेन्शन योजना बाबत juni pension yojana scheme
संदर्भः
– 1. मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील रिट याचिका क्र. 2345/2014 मधील निर्णय दि.27.02.2025.
2. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांचा भ्रमणध्वनी दि. 14.09.2025
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील रिट याचिका क्र.2345/2014 दि.27.02.2025 मधील निर्णयानुसार जे कर्मचारी 1/11/2005 पूर्वी टप्पा अनुदान, अर्धवेळ सहायक शिक्षक पदावर कार्यरत होते व ते दि.01/11/2005 नंतर 100 टक्के टप्पा अनुदान अथवा 100 टक्के अनुदानीत पूर्णवळ पदावर नियुक्त झालेले आहेत अशा कर्मचा-यांच्या बाबतीत रिट याचिका क्र.2345/2014 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाकृती समिती यांचे मार्फत सेक्रेटरी श्री. दत्तात्रय नारायण पाटील विरुध्द महाराष्ट्र शासन मा. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील निर्णयाच्या अनुषंगाने 01/11/2005 नंतर 100 टक्के अनुदानीत शाळेत व 100 टक्के अनुदानीत पदावर नियुक्त झालेल्या कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृती वेतन) नियम 1982 अनुसार सेवानिवृती लाभ देणे बाबतच्या प्राप्त प्रकरणी पडताळणी करुन निर्णय घेणेबाबत कळविण्यात आले आहे.
त्यानुसार खाली दिलेल्या विवरण पत्रामध्ये माहीती सोबत पुरावा म्हणून साक्षांकित अभिलेखे तात्काळ या कार्यालयास सादर करावी. मा. उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका क्र.2345/2014 मधील निर्णय दिनांक 27.02.2025 च्या अनुषंगाने भ.नि.नि. खात्याबाबतची (जुनी सेवानिवृती योजनेबाबतची) माहीती 03 दिवसाच्या आत खालील प्रमाणे या कार्यालयास सादर करावी.










