समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ प्रसिद्धी निवेदनाबाबत kendrapramukh vibhagiy spardha pariksha
महोदय,
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८९/टीएनटी १., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने माहे डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात येत असून, परीक्षेसंदर्भातील प्रसिद्धी निवेदन यासोबत जोडलेले आहे.
सदर प्रसिध्दी निवेदन आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. प्रसिद्धी निवेदन
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी ९., दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी परीक्षार्थी/उमेदवारांनी वेळोवेळी www.mscepune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
अधिसूचना
१. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) यांची समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर २०२५ मध्ये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात येत आहे. २.
प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील खालील प्रमाणे आहे.
२.१ पदनाम समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
२.२ वेतन श्रेणी: एस १५:४१८०० १३२३००
२.३ पदसंख्या:२४१०
२.४ उपरोक्त नमुद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
२.५ शासन निर्णय दि. ०१/१२/२०२२ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्हयातील
उर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या विचारात घेवून उर्दू माध्यमासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) ची पदे निश्चित करतांना अंशतः बदल करू शकतात.
३. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः
३.१ शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली अर्हता अनिवार्य असेल,
४. पात्रता :
४.१ फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. ४.३ दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल,
४.४ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील.
४.५ वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.
अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे स्वरुपः-
उपघटक । : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत
शासन निर्णय-
अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह) ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र
राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी.
क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005 बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिता.
ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती.
इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.
उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य
UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.
उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
अ) इंटरनेटचा प्रभावी वापर
ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे
क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)
ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान
इ) माहितीचे विश्लेषन
फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब
उपघटक 4 अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती
अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम
ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा
क) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन
ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य:ASER, NAS, PISA
इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र
फ) निकालासंबंधीची कामे
उपघटक 5 : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन
अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण
ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे
क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे,
ड) संप्रेषण कौशल्य: समाज संपर्काची विविध साधने
उपघटक 6 : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान
अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
ब) चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी
क) क्रीडा विषयक घडामोडी,
७. निवड प्रक्रिया :-
७.१ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
७.२ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता। पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
७.३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.
८. परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दतः-
८.१ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://www.mscepune.in या लिंकव्दारे
दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पध्दतीने नोंदणी करून आपला
ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
८.२ शासन निर्णय दि. २९.०८.२०२५ अन्वये केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे नाव समूह साधन केंद्र
समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ असे संबोधण्यात येत आहे. या पूर्वी सन २०२३ मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्यापरीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल, त्यांना आता या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यता नाही. तथापि अशा उमेदवारांनी शासन अधिसूचना दि. १८/०७/२०२५ नुसार पात्रता मध्ये झालेल्या सुधारणेरूप सुधारीत अर्हतेची नोंद करणे आवश्यक राहील. या उमेदवारांसाठी अर्हता इ. बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारीत करण्यासाठीची सुविधा या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत उपलब्ध राहील, याची यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
८.३ या पूर्वी सन २०२३ मध्ये केंद्रप्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर परीक्षेसाठी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने ई-मेल वर अर्ज/माहिती सादर केलेली आहे, त्यांनी देखील विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच आवेदनपत्रामधील समाविष्ट केलेल्या सुधारीत मुद्यांची माहिती भरणे आवश्यक राहील.
(संबंधित उमेदवारांचे यापूर्वी परीक्षेचे शुल्क जमा केलेले आहे. त्यांना सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल.)
८.४ परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.
८.५ ऑनलाईन अर्ज सादर करतांना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
(अ) पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (4.5 सेमी X 3.5
सेमी) फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 200 X 300 pixels
फाईल साईज 20 kb – 50 kb
(ब) स्वाक्षरी उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळया शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 140 X 60 pixels
फाईल साईज 10kb -20 kb
(क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी (३ सेमी X ३ सेमी पांढऱ्या कागदावर काळया निळया शाई मध्ये) स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठयाची निशाणी वापरावी.
आकारमान 240 X 240 pixels in 200 DPI
फाईल साईज 20 kb – 50 kb
(ड) शासन अधिसूचना दि. 18/07/2025 मुद्दा क्र. 4 (1) अन्वये केद्रप्रमुख पदापवर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, 2005 मधील तरतुदींनुसार किंवा त्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले अन्य नियम, आदेश किंवा इतर संसाधनानुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील,
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५ मधील प्रतिज्ञापत्राचा नमुना अ स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना
नमुना अ (नियम ४ पहा)
उपरोक्त लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन व स्वः घोषणा प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून त्याची स्कैन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले, आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. (लिहू न शकणाऱ्या अंध अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.)
(इ) स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या स्व-हस्ताक्षरातील उपरोक्त दोन्ही प्रतिज्ञापत्र (१० सेमी X ५ सेमी पांढऱ्या कागदावर काळया/निळया शाई मध्ये लिहीलेले) एकाच कागदावर अपलोड करणे आवश्यक आहे.
आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI
फाईल साईज 50 kb – 100 kb
९. परीक्षेचे शुल्क :
१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. ९५०/-
२. दिव्यांग उमेदवारः रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.
१०. जिल्हा / परीक्षा केंद्र निवडः जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा / परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.
११. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-
१२. सर्वसाधारण :-
१२.१ अर्ज सादर करतांना उमेदवाराने स्वतःचा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य आहे.
१२.२ ऑनलाईन पध्दतीने परीक्षा परिषदेस सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेस कळविणे आवश्यक आहे.
१२.३ “प्रस्तुत परीक्षे करीता अर्ज विचारात घेण्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गटशिक्षणाधिकारी यांनी अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर ५ दिवसाचे आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेस तसे कळविण्याची आवश्यकता नाही.” असेही उमेदवाराने संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे,
१२.४ प्रस्तुत परीक्षा ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा (Qualifying Examination) नाही.
१२.५ परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या (Performance) आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही.
१२.६ परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्या
झालेला असल्यास त्यासंबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूछ तसेच छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
https://drive.google.com/file/d/1w-4uKXXW5kwpUDxdFp_gnD5MMfqIK8Bv/view?usp=drivesdk
१४. परीक्षेस प्रवेश :
१४.१ फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुम्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सुचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षाकक्षात प्रवेश देण्यात येईल,
१४.२ स्मार्ट बीच, डिजिटल वांच, मायक्रोफोन, मोबाईल, कैमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधने म्हणून वापरण्यायोग्य कोणत्याही वस्तू, कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वहया, नोट्स, पुस्तके, बॅग्ज, परिगणक (Calculator) इत्यादी प्रकारची साधने। साहित्य परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास, स्वतः जवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य उमेदवारांनी आणल्यास ते परीक्षा केंद्राबाहेर ठेवण्याची व त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. यासंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अथवा परीक्षा केंद्र व्यवस्थापन अथवा परीक्षा आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
१५. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती/जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.
. सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
१६ . १७. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारांना काही अडचण उद्भवल्यास bpvmscepune2023@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.










