कृती कार्यक्रमांतर्गत वाचन अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी अध्ययनाचे स्तर krutikaryajram adhyayan star kshamta 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कृती कार्यक्रमांतर्गत वाचन अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी अध्ययनाचे स्तर krutikaryajram adhyayan star kshamta 

कौशल्य – वाचन इ.२ री साठी अपेक्षित अध्ययन क्षमता

शासन निर्णय येथे पहा pdf download 

प्रथम भाषेसाठी अपरिचित मजकुरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यानी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो.

अध्ययनाचे स्तर

१. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखत नाही.

२. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखतो.

३. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो.

४. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो.

५. मजकूरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो.

६. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

७. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.

८. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.

९. परिचित मजकुरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१०. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.

११. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी व तयार झालेली लहान वाक्ये

अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.

१२. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१३. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.

१४. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

लेखन भाषेसाठी-

प्रथम ४ ते ५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या २-३ वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो.

१. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही.

२. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो.

३. सोपे शब्द पाहून लिहितो.

४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.

५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हेयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.

८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.

९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये पाहून लिहितो.

१०.२-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्ये ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.

१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१३.२-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.

१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१६.४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो

संख्याज्ञान Numeracy

वस्तु मोजतो व २० पर्यंत संख्याबोध विकसित करतो

अध्ययन स्तर

१. ० ते ९ संख्यानाने क्रमाने म्हणता येत नाहीत.

२. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.

३. ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.

४. ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.

५. ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.

६. ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)

७. १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.

८. १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.

९. २० पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.

१०. १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/याचतो.

११, १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)

शासन निर्णय येथे पहा pdf download 

संख्यावरील क्रिया Number

दैनंदिन जीवनात नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी

१. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.

२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.

३. ० ते ४ पर्यतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

५. वजाबाकीचा ५. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो

६.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

७. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

८. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवितो,

९. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. १०.० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.

१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो,

१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

सदर उद्दिष्टे ही निपुण भारत अंतर्गत नमूद लक्ष्यांपेक्षा कमी आहेत, तथापि, पहिल्या टप्प्यात सदर उद्दिष्टे प्राप्त करुन पुढील टप्प्यात इयत्तानुसार सर्व उद्दिष्टे साध्य करणे आवश्यक आहे.

सोपे शब्द- या कृती कार्यक्रमांतर्गत इ. २ रीच्या दृष्टीने सोपे शब्द म्हणजे पुढील प्रकारचे शब्द, जसे- घर, चाक, मासा, दिवा, जीभ, खेळ, पटकन, बैल, पोपट, यासारखे शब्द.

सोपी जोडाक्षरे- या कृती कार्यक्रमांतर्गत इ. २ रीच्या दृष्टीने सोपी जोडाक्षरे म्हणजे पुढील प्रकारची जोडाक्षरे, जसे – गाड्या, आत्या, किल्ला, हत्ती, गप्पा, यासारखे जोडाक्षरयुक्त शब्द.

शासन निर्णय येथे पहा pdf download 

Related posts:

Leave a Comment