जाहीर प्रकटन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.टी.एड्. maharashtra rajya pariksha parishad

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जाहीर प्रकटन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.टी.एड्. maharashtra rajya pariksha parishad

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.टी.एड्. सप्टेंबर-२०११ परीक्षेचे आयोजन संपूर्ण राज्यात दि. १३/०९/२०११ ते २२/०९/२०११ या कालावधीत केलेले होते. सदर परीक्षेचा निकाल दि. ०३/०१/२०१२ रोजी जाहीर करण्यात आलेला होता. सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या व द्वितीय वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकामध्ये महत्त्वाची टिप मध्ये :- अध्यापक शिक्षण पदविका (अभ्यासक्रम २००४) उत्तीर्ण झालेल्या डी.टी.एड प्रशिक्षणार्थीने आंतरवासिता कालावधी समाधानकारक पूर्ण केल्याचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला सादर केल्याशिवाय हे गुणपत्रक नोकरीसाठी ग्राहय धरण्यात येणार नाही अशी टिप आहे.

डी.टी.एड्. विद्यार्थ्यांकरीता आंतरवासिता दि. १८/१२/२००७ ते २८/०२/२०११ या कालावधीतच सुरु होती. शासनाचे दि. ०९/०२/२०११ रोजीच्या परिपत्रकान्वये दि. ०१/०३/२०११ नंतर आंतरवासिता डी.टी.एड्. अभ्यासक्रमातून रद्द करण्यात आलेली आहे. यामुळे सप्टेंबर २०११ च्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या व द्वितीय वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ०३/०१/२०१२ रोजी जाहीर झालेला असल्याने सदर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकात नमूद केलेली उपरोक्त महत्त्वाची टिप सप्टेंबर २०११ च्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास लागू होत नाही, याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment