महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०३ पदवीधर (औरंगाबाद, पुणे, नागपूर) व ०२ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूका-२०२६ maharashtra vidhan parishad election circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०३ पदवीधर (औरंगाबाद, पुणे, नागपूर) व ०२ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूका-२०२६ maharashtra vidhan parishad election circular

संदर्भ:- १. भारत निवडणूक आयोग यांच्याकडील प्रसिध्दीपत्रक दि. २२.९.२०२६

२. भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांचे संकलन-२०२४ व्हाल्यूम-३ या

पुस्तिकेमधील पत्र क्र.४३७/६/INST/ECI/ FUNCT/MCC/२०२४, दिनांक ०२.०१.२०२४.

महोदय,

भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक २२.९.२०२६ च्या प्रेस नोट पत्राद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०३ पदवीधर (औरंगाबाद, पुणे, नागपूर) व ०२ शिक्षक मतदारसंघांच्या (अमरावती व पुणे) रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक-२०२६ बाबत निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला आहे. व दिनांक २२.९.२०२६ पासून सदर मतदारसंघांमध्ये तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. आता औरंगाबाद, पुणे, नागपूर या पदवीधर मतदारसंघातील तसेच पुणे आणि अमरावती या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांची मतमोजणी दिनांक २७.१०.२०२६ रोजी पार पडलेली असुन तेथील निकाल संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी घोषित केलेले आहे.

यास्तव भारत निवडणूक आयोगाकडील उपरोक्त संदर्भाधिन २ येथील दिनांक ०२.०१.२०२४ (सुचना अनुक्रमांक १) मधील परिच्छेद क्रमांक १- आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी या शिर्षाखालील ओ (ii) मधील तरतुदीनुसार, ०३ पदवीधर (औरंगाबाद, पुणे, नागपूर) व ०२ शिक्षक मतदारसंघांतील (अमरावती व पुणे) विधानपरिषदेच्या निवडणुका होवून मतमोजणीचे निकाल घोषित करण्यात आलेले असल्यामुळे, त्या पाचही मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे, याची कृपया नोंद घ्यावी, हि विनंती.

Related posts:

Leave a Comment