कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याकरिता कार्यवाही करण्याकरिता तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस मुदतवाढ देणेबाबत maratha arakshan vanshaval 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याकरिता कार्यवाही करण्याकरिता तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस मुदतवाढ देणेबाबत maratha arakshan vanshaval

वाचाः –

१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.मआसु-२०२३/प्र.क्र.०३/१६-क, दि.०७.०९.२०२३.

२. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. सीबीसी-२०२४/प्र.क्र.०९/मावक, दि.२५.०१.२०२४.

३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.मआसु-२०२३/प्र.क्र.०३ (भाग-१)/आरक्षण-५(१६-क), दि.१२.०२.२०२५.

प्रस्तावनाः –

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहीत करण्याकरिता वाचा क्र.१ येथील शासन निर्णयान्वये मा. न्यायमुर्ती श्री. संदिप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यास अनुसरून कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वाचा क्र.२ येथील शासन निर्णयान्वये समिती गठित करण्यात आलेली आहे.

वाचा क्र.३ येथील शासन निर्णयान्वये मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली गठीत समितीस दि.३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर समितीच्या दि.०३.०३.२०२५ रोजीच्या आढावा बैठकीमध्ये मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वंशावळी जुळविण्याचे कामकाज अद्याप पूर्ण झालेले नसल्यामुळे वाचा क्र.२ अन्वये तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या वंशावळ समितीस दि.३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याची कार्यवाही करण्याकरिता तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली वाचा क्र.२ येथील शासन निर्णय, दि.२५.०१.२०२४ अन्वये गठित समितीस दि.३०.०६.२०२५ पर्यंत याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. सदर समितीस वाचा क्र.२ येथील शासन निर्णयातील तरतूदी लागू राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०२५०४२९१४३७०७८७२२ असा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment