“आईची शिकवण” मराठी बोधकथा marathi bodhkatha

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“आईची शिकवण” मराठी बोधकथा marathi bodhkatha

आईची शिकवण

शाळेत जाताना आई आपल्या लाडक्या मुलाला म्हणाली, “बाळ तुला मी आज डब्यात दोन लाडू देत आहे. एक तू खा व दुसरा तुझ्या गरीब मित्राला दे.” “ठीक आहे!” असे म्हणून आईचा निरोप घेत तो मुलगा शाळेत गेला.

मधल्या सुट्टीत त्याने मोठा व थोडा जास्त ताजा वाटणारा लाडू आपल्या मित्राला दिला आणि स्वतः मात्र थोडा खाल्ला. घरी आल्यावर आईने विचारले, “माधव, तुझ्या मित्राला तू कोणता लाडू दिलास? छोटा की मोठा?”

माधव म्हणाला, “आई तूच मला एक दिवस शिकवले होतेस की, चांगली गोष्ट नेहमी दुसऱ्याला दयावी. त्याप्रमाणे मोठा व चांगला लाडू मी मित्राला दिला. छोटा मी खाल्ला!”

आईला आपल्या मुलाची नकळत परीक्षा घ्यायची होती. त्याचा स्वभाव पाहायचा होता. तिच्या परीक्षेत तो उतरला. ती म्हणाली, “शाब्बास ! दुसऱ्याला जास्त देण्यात व स्वतःला कमी घेण्यातच आनंद असतो आणि हा आनंद काही वेगळाच असतो.” “आई! आज मी त्या आनंदाचा अनुभव घेतला.” मुलाच्या त्या बोलण्याने आईची मनोमन खात्री झाली की, पुढील आयुष्यात हा कोणी तरी महान बनेल. खरोखरच त्या मुलाने मोठेपणी खूप नाव कमावले व तो प्रख्यात न्यायाधीश व समाजसुधारक झाला.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या लहानपणीची ही गोष्ट आहे.

1 thought on ““आईची शिकवण” मराठी बोधकथा marathi bodhkatha”

Leave a Comment