सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी देणे बाबत medical bill deyak adakarne
संदर्भ – क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त २५-२६ या आर्थिक वर्षाची बाब निहाय माहिती
शासन स्तरावरून त्या त्या आर्थिक वर्षात मंजूर व प्राप्त अनुदानातून देयक अदा करतांना त्या आर्थिक वर्षांतील माहे मार्च ते फेब्रुवारी या महिन्याचा नियमित वेतनाचा खर्च भागविणे क्रमप्राप्त आहे. तसेच वेतना व्यतिरिक्त अन्य देयकासाठी आवश्यक असणारे जादाचे अनुदान उपलब्ध असल्याचे अथवा उपलब्ध करून देण्याची खात्री करूनच देयके अदा करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्हयाचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशिर्ष २२०२०४४२ २२०२०४७८,२२०२०५३१,२२०२०५५८,२२०२०५७६,२२०२०५४९,२२०२१९०१ २२०२०४६९, मध्ये उपलब्ध करून दिलेल्या अनुदनातून वैद्यकीय देयके ऑनलाईन पध्दतीने अदा करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय देयक अदा करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीत विकसीत करण्यात आली त्यानुसार फेब्रुवारी २०२४ पासून सर्व देयके ऑनलाईन अदा होत आहे.
१. केवळ उपरोक्त लेखाशिर्षामध्ये वैद्यकीय देयके यथानियम ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात यावे.
२. वैद्यकीय देयके अदा करतांना नियमित वेतनासाठी अनुदान कमी. पडणार नाही याची खात्री करूनच संबधित
वेतन पथक / संबधित कार्यालय यांनी देयके अदा करावीत…
३. शासनाकडून वेळोवळी उपलब्ध करून देण्यात आलेलेल्या अनुदानातून उपरोक्त खर्च भागविण्यात यावा.
४. कोणत्याही परिस्थितीत वेतन ही बाब प्रलंबित ठेवून वैद्यकीय देयके अदा करण्यात येवू नये.




![Inviting online Application Form for National Eligibility-cum-Entrance Test [(NEET (UG)] 2026-reg](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/02/Screenshot_2026_0208_175316-150x150.jpg)





