शुद्धिपत्रक महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६, जाहिरात mpsc recruitment circular
विषयः- महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६, जाहिरात क्रमांकः ०१७/२०२६, दिनांक २५ जून, २०२६
संदर्भ:- आयोगाचे दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२६ रोजीचे शुद्धिपत्रक
आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून विविध संवर्गातील एकूण १६७१७ रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२६ रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
२. उपरोक्त दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकातील परिशिष्ट- १ मधील अनुक्रमांक २३ मध्ये शिल्प निर्देशक/व्यवसाय निदेशक, गट-क संवर्गाच्या विविध विषयाकरीता पदे विज्ञापित करण्यात आली आहेत. सदर पदांकरीता दिनांक ३१ जुलै, २०२६ रोजीच्या सेवाप्रवेश नियमातील अर्हता आणि शासन पत्र, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या, क्रमांक व्यशिअ-२०२६/३.क्र.१८५३७०३/व्यशि-१. दिनांक १३ नोव्हेंबर, २०२६ अन्वये कळविलेली अर्हता ग्राह्य समजण्यात येईल. त्यानुसार प्रस्तुत शुद्धिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मध्ये नमूद त्या-त्या विषयाच्या नावासमोर दर्शविलेली संबंधित शाखेतील पदवी किंवा पदविका किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
३. तसेच दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकातील परिशिष्ट-१ मधील अनुक्रमांक १९ वरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अनुक्रमांक २७ वरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, जलसंपदा विभागाकरीता शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका किंवा पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समकक्ष म्हणून जाहिर केलेली अन्य कोणतीही पात्रता धारण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. याअनुषंगाने शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३/(४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ पदविका करीता ग्राह्य असलेली समतुल्य शैक्षणिक अर्हता, प्रस्तुत शुद्धिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्र- ब मध्ये दर्शविण्यात आल्यानुसार ग्राह्य धरण्यात येईल.
४. ज्या उमेदवारांनी यापूर्वी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर केलेला आहे, आणि दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकान्वये प्रस्तुत परीक्षेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या संवर्गाकरीता देखील शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरत असून त्यांच्या Profile मधील शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करू इच्छितात, अशा उमेदवारांनी त्यांच्या Profile मधील शैक्षणिक अहंता सुधारित [Update] करून घेणे आवश्यक राहील, शैक्षणिक अर्हता सुधारित करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे:-
(अ) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील “Profile Creation” सदराखाली त्यांच्या “Profile” मध्ये शैक्षणिक अर्हता सुधारित करून “Profile Lock” करावे.
(ब) Qualification Update झाल्यानंतर उमेदवार शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता पात्र ठरत असल्यास अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील My Account सदराखाली जाहिराती समोरील “View” बटनावर व त्यानंतर उजव्या बाजूला “Qualification Update” बटनावर क्लिक करून Qualification update करावे. त्यानंतर “Recheck Eligibility” बटनावर क्लिक करून “उजव्या बाजूकडील स्तंभामधील” ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून “Apply व Submit” बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही किंवा यापूर्वी सादर केलेला अर्ज Cancel करण्याची आवश्यकता नाही.
५. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ करीता मूळ जाहिरात आणि जाहिरातीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.










