महाराष्ट्रातील सर्व कार्यरत अंशकालीन क्रीडा शिक्षकांचे समायोजन अगोदर करून, उर्वरीत पदे पवित्र पोर्टलमार्फत भरणेबाबत anshkalin krida shikshak pavitra portal
संदर्भ:
महाराष्ट्र राज्य कला, क्रिडा व कार्यानुभव शिक्षक संघ यांचे दि. १९.०५.२०२६ रोजीचे पत्र.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भाधीन दि. १९.०५.२०२६ रोजीचे पत्र सोबत जोडले आहे. यावर मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनी प्र.स.शा.शि. उचित कार्यवाही करावी.” असे निर्देशित केलेले आहे.
२. प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने आपल्या सुस्पष्ट अभिप्रायांसह सविस्तर अहवाल तात्काळ शासनास सादर करावा, ही विनंती.










