समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी १ (PAT २) च्या आयोजनाबाबत pat exam timetable shasan paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी १ (PAT २) च्या आयोजनाबाबत pat exam timetable shasan paripatrak 

संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा. क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/पा.चा. जिल्हा पत्र/२०२५-२६/SCERT ३८.०/२९/२०२५-EVALUATION //१३१९४६९/२०२५ दिनांक ०९/०७/२०२५.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

* संकलित मूल्यमापन-१ चाचणी उद्देश/उपयोग/फायदे :-

१) अध्ययनाचे मूल्यमापन या तत्वाकडून अध्ययनासाठी मूल्यमापन या तत्वाकडे वळणे,

२) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.

३) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे.

४) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत करणे.

५) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा देणे.

६) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होणे.

* नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) कालावधी

संकलित मूल्यमापन चाचणी १ चे माध्यम व विषय :

सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या त्तीन विषयांची इयत्ता २ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

संकलित चाचणी- १ चा अभ्यासक्रम :

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

प्रचलित पद्धतीनुसार भाषा, गणित व इंग्रजी करिता प्रथम संत्रात अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती/मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

संकलित मूल्यमापन चाचणी-१ चे वेळापत्रक (कालावधी दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२५ )

शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून

वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम)

व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात

घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

संकलित चाचणी-१ च्या अंमलबजावणीबाबत सूचना :

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

१. संकलित चाचणी-१ ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२. संकलित चाचणी १ करीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.

३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

४. संकलित चाचणी १ च्या चाचणी पत्रिका अंदाजित दि. २५ सप्टेंबर २०२५ ते ०५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत वितरीत करण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येणार आहेत.

५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.

६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.

७. प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी इयत्ता २ री ते ८ वी च्या UDISE + च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच पोहोच द्यावी.

आ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच मुख्याध्यापकाच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणीपत्रिका अथवा इत्तर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

इ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

८. चाचणीपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी, चाचणीपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी.

९. तालुका स्तरावर चाचणीपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.

११. सन २०२५-२६ च्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या जिल्हानिहाय, तालुकानिहाय, माध्यमनिहाय व इयत्तानिहाय UDISE (२०२५ २६ चा दि. २६ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या प्राप्त माहिती) मधील संख्या तसेच शिक्षणाधिकारी यांचेकडून दि. ०९

सप्टेंबर २०२५ पर्यंत सेमी / नॉन सेमी (गणित) प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणीपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. UDISE प्रमाणेच शाळांना प्रत्यक्ष चाचणी पत्रिका वितरण करण्यात यावे. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या चाचणी पत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) / शिक्षण निरीक्षक/प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील.

१२. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.

१३. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी…

१४. प्रस्तुत संकलित चाचणी-१ कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या वेबसाईटवर चाचणीपूर्वी उपलब्ध असतील. उत्तरसूची चाचणी दिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.

१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त चाचणीपत्रिका देण्यात याव्यात.

१६. संकलित चाचणी-१ चे गुणनोंद चाचणी पत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.

१७. संकलित चाचणी- १ मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

संकलित चाचणी-१ च्या कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत –

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.

२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.

३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.

४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही तारखांमध्ये बदल करायचे असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेवूनच बदल करावा.

वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी- १ च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.

संकलित चाचणी -१ चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.

सर्व शिक्षकांना हे आवर्जून कळविण्यात यावे की, सदर चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नाही. सबब सर्व चाचण्या प्रामाणिकपणे घेवून विद्यार्थ्यांचे गुणदानही त्याच पद्धतीने करून त्याची माहिती विद्या समीक्षा केंद्र (VSK) Chatboat वर भरावी, या माहितीचा उपयोग केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अध्ययनविषयक गरजा शोधून प्रभावी उपाययोजना करण्यासाठीच होईल याची प्रकर्षाने सर्वांनी नोंद घ्यावी.

शासन परिपत्रक येथे पहा pdf download

Related posts:

3 thoughts on “समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी १ (PAT २) च्या आयोजनाबाबत pat exam timetable shasan paripatrak ”

Leave a Comment