प्रजासत्ताक दिनानिमित्त “असाक्षर मुक्त गावाची शपथ” घेणेबाबत republic day
संदर्भ :-
१. शासन निर्णय क्रमांक नभासाका ०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.२, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक १४/१०/२०२२
२. शासन निर्णय क्रमांक नभासाका ०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.२, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक २५/०१/२०२३
३. शिक्षण संचालक, योजना तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. शिसंयो/यो-३/नभासाका/प्र.दि. शपथ/२०२५-२६/२०९६ दिनांक २२/०१/२०२६
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ नुसार केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क्रमांक २ नुसार, सन २०२२ ते २०२७ पर्यंत चालणाऱ्या उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/गटस्तरीय/शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य स्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत “असाक्षर मुक्त गावाची शपथ” घेतल्यास १०० टक्के साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे.
शपथ pdf download here
तरी सदर “असाक्षर मुक्त गावाची शपथ” प्रत्येक विद्यार्थ्याने घेण्याबाबत आपण आपल्या अधिनस्त यंत्रणेस आदेशित करावे. सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे व सोशल मिडीया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. असे संदर्भ क्रमांक ३ च्या योजना संचालनालयाच्या पत्राव्दारे कळविण्यात आलेले आहे. (सोबत संदर्भ क्रमांक ३ चे पत्र व “असाक्षर मुक्त गावाची शपथ” / साक्षरता शपथेचा नमुना जोडला आहे.)
त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या संदर्भ क्रमांक ३ च्या पत्रातील सूचना निदर्शनास आणून “असाक्षर मुक्त गावाची शपथ” घेणेबाबत संबंधितांस आपल्या स्तरावरून सूचित करावे.










