सन २०२५-२६ संच मान्यतेसाठी भरलेली चुकीची माहिती रिव्हर्स करण्याबाबतच्या शाळांची माहिती सादर करणेबाबत sanchmanyata 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२५-२६ संच मान्यतेसाठी भरलेली चुकीची माहिती रिव्हर्स करण्याबाबतच्या शाळांची माहिती सादर करणेबाबत sanchmanyata

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सन २०२५-२६ ची संच मान्यता निर्गमित करण्यासाठी शाळा /महाविद्यालयांनी भरलेली माहिती आधारभूत मानली जाणार आहे. तथापि, आपल्या विभागातील काही शाळांनी माहिती भरताना तांत्रिक अडचणीमुळे /अनावधानाने चुकीची माहिती भरली असून ती HM स्तर आणि शिक्षणाधिकारी स्तरावरून ‘फायनल (Finalize) देखील झाली आहे.

सदर माहिती चुकीची असल्याने संच मान्यतेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ही माहिती दुरुस्त करण्यासाठी सदर डेटा रिव्हर्स (Reverse) करण्याची आवश्यकता असल्याचे अनेक शाळांकडून कळवण्यात आले आहे.

त्यानुसार, आपल्या कार्यक्षेत्रातील ज्या शाळांना अशा प्रकारे माहिती रिव्हर्स करायची आहे, अशा शाळांची यादी खालील तक्त्यात संकलित करून या कार्यालयास तात्काळ सादर करावी,

Related posts:

Leave a Comment