३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम sarvatrik nivadnuk election votter list

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम sarvatrik nivadnuk election votter list 

संदर्भ :- १)

शासन परिपत्रक pdf download

मा. सर्वोच्च न्यायालयाने पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपिल (सी) क्र. १९७५६/२०२१ व इतर संलग्न याचिकांमध्ये दि.०६/०५/२०२५ व दि.१६/०९/२०२५ रोजी झालेला निर्णय

२) ग्राम विकास विभागाचे क्र. जिपनि-२०२५/प्र.क्र.३६/पं.रा.-२ दि.१२/०६/२०२५ रोजीचे पत्र व सोबतचा प्रभाग रचना कार्यक्रम.

३) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक-रानिआ/ग्रापंनि-२०२३/प्र.क्र.०३/का.-८, दि.१६/०७/२०२५

४) राज्य निवडणूक आयोगाची क्रमांक-रानिआ/जिपपंस-२०२५/प्र.क्र.२०/का.०७, दि. २१/०८/२०२५ रोजीची अधिसूचना

महोदय/महोदया,

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भाकित अ.क्र.१ समोरील दि.०६/०५/२०२५ रोजीच्या निर्णयानुसार ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राम विकास विभागाने संदर्भाकित अ.क्र. २ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार दि.२२/०८/२०२५ पर्यंत अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

२. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भाकित क्रमांक १ समोरील नमूद आदेशानुसार ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका विहित वेळेत पार पाडण्यासाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक झाले आहे.

शासन परिपत्रक pdf download

३. सबब, आता ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद निवडणूक विभागनिहाय (गट) व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय (गण) मतदार यादी तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :-

४. मतदार यादीच्या कार्यक्रमाची व्याप्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाधीन अ.क्र.४ समोरील दि.२१/०८/२०२५ रोजीच्या अधिसूचनेन्वये दि.०१/०७/२०२५ हा अधिसूचित दिनांक (Cut-off-date) जाहीर केला असून, त्यादिवशी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येईल, असे अधिसूचित केले आहे.

सदर अधिसूचित दिनांकास म्हणजेच दि.०१/०७/२०२५ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी परिशिष्ट-२ मध्ये नमूद ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वापरण्यात येईल.

उपरोक्त निवडणुकांकरिता भारत निवडणूक आयोगाकडील दि.०१/०७/२०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे विभाजन करण्याची कार्यवाही

करण्यात यावी.

५. उपरोक्त मतदार यादी ग्राहय धरुन परिशिष्ट-२ मध्ये नमूद ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम परिशिष्ट-१ प्रमाणे राहील. त्याचा थोडक्यात तपशिल खालीलप्रमाणे आहे:-

६.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी तयार करणे :-

६.१ जिल्हाधिकारी यांनी विधानसभेच्या मतदार याद्यांचे खालीलप्रमाणे निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय विभाजन करावे. यासाठी आयोगाने नवीन वेबसाईट https://mahasecvoterlist.in विकसित केली असून या वेबसाईटचा वापर करण्यात यावा.

शासन परिपत्रक pdf download

आयोगाकडून युजर आयडी व पासवर्ड दिल्यानंतर Assembly Master, Panchayat Samiti Master, Electoral Colleges & Electoral Division Master (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) मध्ये अचूक माहिती भरणे.

(10)

त्यानंतर “मदररोल मास्टर” या टॅबमधून संबंधित विधानसभा मतदार संघ व त्याचे यादी भाग यांची मतदार यादी डाऊनलोड करणे.

(iii)

संबंधित तहसिलदारांनी मदर रोलची विभागणी करुन कंट्रोल चार्ट तयार करणे व अपलोड करणे. ही कार्यवाही विहित मुदतीत करुन घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहील.

६.२

(iv) कंट्रोल चार्ट प्रोसेस करुन संगणक प्रणालीमधून मतदार यादीची पीडीएफ डाऊनलोड करणे.

महाआयटीतर्फे तयार केलेल्या आज्ञावलीच्या मदतीने निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार यादीचे विभाजन करावे.

६.३ निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार यादी तयार करताना पुढील बाबींची खात्री करुन घ्यावी :-

अ) राज्य निवडणूक आयोगाने आदेश क्र. रानिआ/ग्रापंनि-२०२३/प्र.क्र.०३/का-८, दि.१६/०७/२०२५ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता मतदार यादी तयार करण्याच्या अनुषंगाने एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत, त्यानुसार मतदार यादी विभाजनाची कार्यवाही करावी.

ब)

ब)

विधानसभा मतदार यादीत संबंधित निवडणूक विभाग व निर्वाचक गण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि संबंधित निवडणूक विभाग व निर्वाचक गणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान आहे, याची खातरजमा करण्यात यावी, जेणेकरुन कोणत्याही मतदाराचे नाव सूटणार नाही.

विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये बदल करण्याचे जसे की, नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे, नावातील दुरुस्ती व पत्यांमधील दुरुस्ती करणे इत्यादींबाबतची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. (आयोगाचे क्र.रानिआ-२०१५/प्र.क्र.३/प्रकल्प कक्ष, दि. १७/०४/२०१५ चे आदेश)

क) मतदार यादीतील दुबार नावाबाबत आयोगाच्या दि.१६/०७/२०२५ रोजीच्या आदेशातील परि. ०५ मध्ये कार्यपध्दती विहीत केली असून त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.

७. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करुन हरकती व सूचना मागविणे :-

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय तयार करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर मतदार / नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यासाठी, प्रारुप मतदार यादीला दि.०८/१०/२०२५ रोजी व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. (परिच्छेद १० प्रमाणे) या प्रारुप मतदार यादीवर मतदारांना व नागरिकांना दि. १४/१०/२०२५ पर्यंत हरकती किंवा सूचना दाखल करता येतील.

८. प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन मतदार यादी अंतिम करणे :-

८.१ दि.०८/१०/२०२५ ते दि.१४/१०/२०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर नियमाप्रमाणे विचार करुन मतदार यादी अंतिम करण्यात यावी.

शासन परिपत्रक pdf download

प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांनुसार फक्त खालीलप्रमाणे सुधारणा/दुरुस्ती करता येईल:-

60 लेखनिकांच्या चुका.

दुसऱ्या गटा/गणातील (निवडणूक विभाग/निर्वाचक गण) चुकून अंतर्भूत झालेले मतदार.

संबंधित विधानसभा यादीत मतदारांची नावे असूनही, संबंधित निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट करण्याचे राहून गेले असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे.

८.२ विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन आवश्यक असल्यास योग्य त्या सुधारणा करुन अंतिम मतदार याद्या तयार करण्यात याव्यात.

९. अंतिम मतदार याद्या अधिनियमातील तरतुदीनुसार अधिप्रमाणित करुन त्याबाबतची सूचना दि.२७/१०/२०२५ रोजी परिच्छेद क्र. १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रसिध्द करण्यात यावी.

१०. प्रारुप व अंतिम मतदार यादीस जिल्हाधिकारी यांनी खालीलप्रमाणे व्यापक प्रसिध्दी द्यावी

जसे-

(अ) जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलक.

(ब) स्थानिक वृत्तपत्र.

(क) स्थानिक केबल टि.व्ही.

(ड) जिल्हाधिकारी / जिल्हा परिषद कार्यालयातील संकेत स्थळ, इत्यादी.

११. प्रत्येक मतदान केंद्रात १०००-११०० मतदार जोडण्यात यावेत. तथापि, मतदार यादीची विभागणी करताना निवडणूक विभाग व निर्वाचक गणातील उर्वरित मतदार हे किमान अगर कमालपेक्षा कमी किंवा अधिक (१०% पर्यंत) असतील तर त्यासाठी वेगळ्याने मतदान केंद्र करण्याची आवश्यकता नाही.

१२. वरील सूचनांप्रमाणे आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीचे विभाजन विहित मुदतीत व बिनचूक करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहील.

१३. मतदार यादीचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर एखाद्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीबाबत न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यास संबंधित निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचा मतदार यादीचा कार्यक्रम स्थगित करुन त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगास तात्काळ सादर करावा.

१४. आयोगाकडून देण्यात येणाऱ्या मतदार यादी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोगाच्या नोडल अधिकारी (संगणकीकरण) यांच्याकडून आज्ञावली देण्यात येणार असून त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या संगणकीकरण कक्षामधील खालील दूरध्वनी किंवा ई-मेलद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.

दूरध्वनी क्रमांक-०२२-२२८८६९५०/२२०२२९०९

Email-sec.compu@mah.gov.in

१५. मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाच्या https://mahasec.maharashtra.gov.in या

संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शासन परिपत्रक pdf download

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांचे आदेशानुसार,

Related posts:

Leave a Comment