विमानाचा शोध लावणारे महान शास्त्रज्ञ “राईट बंधूंचे” scientist wright brothers
विल्बर राईट (१६ एप्रिल, १८६७ ३० मे, १९१२)
ऑव्र्व्हिल राईट (१९ ऑगस्ट, १८७१ ३० जानेवारी, १९४८)
विमानाचा शोध हा कुतूहलाचा विषय आहे.
तो विसाव्या शतकाचा सुरुवातीचा काळ होता.
विल्बर व ऑव्र्व्हिल राईट या बंधूंनी एकत्र काम करून उड्डाणशास्त्राच्या एअरोनॉटिक्स वाट चुकलेल्या अभ्यासाला मार्गावर आणून पहिले ‘हवेहून जड’ विमान तयार केले, त्याची प्रात्यक्षिके देत नवेनवे विक्रम प्रस्थापित केले.
ऑर्व्हिल राईट
विल्बर राईट
त्यापूर्वी ‘बलून’ किंवा ‘वायुयान’ एयरशिप वापरून हवेत फिरणे शक्य असे. पण ही वाहने हवेपेक्षा हलकी असल्याने त्याला उड्डाण न म्हणता तरंगणं म्हणावे लागेल. राईट बंधू दोघांचे काम इतके एकत्र होते की, एकाला सोडून दुसऱ्याचा विचारच करता येत नाही. दोघांपैकी थोरला विल्बर! त्याचा जन्म अमेरिकेत इंडियाना प्रांतात ‘मिल्व्हिल’ या गावी १६ एप्रिल, १८६७ रोजी झाला. तर धाकट्या ऑव्हिलचा ओहायो प्रांतातील ‘डेटन’ इथे १९ ऑगस्ट, १८७१ रोजी झाला. लहाणपणी छंद म्हणून ते खेळणी उडवत. विल्बर, ऑव्र्व्हिल राईट या दोघा भावांना आकाशात उडणारे पक्षी बघायला छान वाटत असे. आपल्यालाही असे आकाशात उडता आले तर…! हाच विचार त्यांच्या मनात आला असावा. म्हणूनच त्यांच्या वडिलांनी एक खेळणे आणले. ते त्यावेळी लहान होते. ते खेळणे मोठे मजेशीर होते. रबराच्या मदतीने त्या खेळण्यातील पंखा फिरू लागायचा, ते खेळणे मग हवेत उडायचे, चांगले दहाबारा फूट वर जायचे. पुन्हा खाली यायचे, रबराचा ताण संपला, की पंखा बंद व्हायचा, खेळणे खाली जमिनीवर उतरायचे. मात्र हवेत उडण्यापूर्वी आजच्यासारखे प्रथम जमिनीवर धावत जायचे नाही, तर सरळ वर जायचे हेलिकॉप्टरसारखे. या खेळण्यामुळे राईट बंधुंच्या मनात प्रथम उडण्याविषयीचा विचार आला. त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. विल्बर आणि ऑव्र्व्हिल राईट बंधुंना पतंगाचे वेड होते, त्यांनी तयार केलेला पतंग हवेत उंच जायचा. सर्व लोकांना त्यांच्या पतंगाचे ही कौतुक वाटायचे. पतंगासारखे आपण हवेत उंच उडून वर गेले तर? असाच प्रयत्न जर्मनीत कुणीतरी केला व अपघात झाला. राईट बंधू या बातमीने घाबरले नाहीत. तर आणखी जिद्दीने कार्यास लागले. पतंग आकाशात उडवायचेच त्याला पक्ष्यासारखे पंख लावले तर? पक्षी नाही का हवेत उडतात! असे अनेक विचार ते करत होते. विमान तयार करून उडण्याचा प्रयोग हळूहळू आकार घेत होता. विमानाचे वेगवेगळे नमुने ते घेत होते. अखेर एक विमान तयार झाले. त्यात एक यंत्र बसवले होते. एक माणूस त्यात बसण्याची क्षमता होती. एका भावाने यंत्र सुरू केले व दुसरा त्यात बसला, विमान हवेत काही क्षण राहिले. ते केवळ १० फुट उंच गेले. विमान सुरू होताच ते चाळीस फूट जमिनीवर धावले आणि मग वर झेपावले. असे जमिनीवरून केवळ शंभर फूट उडाले. हा विमान उडवण्याचा पहिला प्रयोग होता, तो पाहण्यासाठी केवळ चारपाच लोक
जमा झाले होते. विमान जमिनीच्या वर हवेत तरंगलं! या यशाने राईट बंधुचा आत्मविश्वास आणखी वाढला. मग त्याच विमानाने ते पुढे दोनशे ते हजार फूट हवेत तरंगत गेले. विमानाची कल्पना साकार झाली. राईट बंधुचे हे पहिले विमान आजही अमेरिकेत जतन करून ठेवले आहे. सुधारित विमान पूर्णपणे आकारास येईपर्यंत राईट बंधुना खूप मेहनत घ्यावी लागली. विमानाची पहिली चाचणी दोघांपैकी कोणी करायची, हे नाणेफेक करून ठरवले. ते ऑव्हिलने उडवले. लाकडी रूळांवर ठेवलल्या विमानाचं इंजिन सुरू करून धक्का देण्याचे काम विल्बरने केले. १२ सेकंद हवेत राहून १२० फूट ३७ सेकंद प्रवास करून विमान खाली उतरले, हे जगातले पहिले विमान उड्डाण! या उड्डाणाने १७ डिसेंबर, १९०३ रोजी ‘किटी हॉक’ इथे इतिहास घडवला. ‘राईट फ्लायर’ पहिल्या दिवशी दोघांनी आळीपाळीने दोन-दोन उड्डाणे केली. पहिल्या दिवशीचे सर्वांत मोठे उड्डाण ५९ सेकंदांत ८५२ फूट (२३६) मीटर अंतर कापून विल्बरने केले. हा इतिहास घडला खरा; पण अमेरिकन जनतेने, विशेषतः गुंतवणुकदारांनी त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. पत्रकारांना बघायला बोलावले असतानाच खराब हवामानामुळे, उड्डाण होऊ शकले नाही. त्यामुळे वर्तमानपत्रात टवाळकीच केली गेली.
जवळचे पैसे संपुष्टात येत चालले होते; तरीही नाउमेद न होता शांत स्वभावाच्या राईट बंधुंनी अधिक चांगले इंजिन व अधिक चांगले विमान बनवण्याचा उदयोग चालूच ठेवला. पहिल्या फ्लायरनंतर फ्लायर-२ व फ्लायर-३ ही विमाने तयार झाली. १९०८ मध्ये विल्बरने फ्लायर ३ फ्रान्समध्ये नेऊन सर्वाधिक उंची व अंतर गाठण्याचा विक्रम प्रस्थापित केला. अमेरिकन सैन्यदलाने या नव्या शोधात रस घेतला. यापूर्वी सैन्यदलाला युद्धक्षेत्राच्या पाहणीसाठी वायू यानांचा वापर करावा लागे. विमानामुळे ही पाहणी किती तरी वेगाने व सुरक्षितपणे होईल, हे लक्षात घेऊन ताशी ४० मैल (६४ किमी) वेगाने १० मिनिट उडू शकणाऱ्या विमानाचे उत्पादन करण्याचे कंत्राट राईट बंधुंना दिले गेले. ९ सप्टेंबर, १९०८ रोजी ‘जगातला पहिला विमान प्रवासी’ होण्याचा मान ऑव्र्व्हिलच्या जोडीने विमानातून फिरलेल्या ‘लेफ्टनंट पी. लाम’ याला मिळाला, १९०९ मध्ये विल्बरच्या अध्यक्षतेखाली ‘अमेरिकन राईट कंपनी’ स्थापन झाली. आता विमानामुळे देश-विदेशातील प्रवास सोपा झाला आहे. विमान सैन्याकरिता फार महत्त्वाचे साधन आहे. विमानात हळूहळू संशोधनाद्वारे बदल केले गेले. युद्धात तर विमानाचा वापर होऊ लागला. आणि शत्रूच्या प्रदेशात सरळ घुसून बॉम्ब टाकून परत यायचे, जसे दूरवर विमानात जाता येते तसेच वर उंच हवेत जाण्याचा शोध लागला. ताशी शेकडो किमी वेगाने विमाने जाऊ लागली. त्याचप्रमाणे शेकडो लोक एकाच वेळी विमानात बसून जाऊ लागले. एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करण्यासाठी जहाजाने खूप कालावधी लागायचा, आता मात्र वेळेची बचत होत होती.
घेतली गरुड भरारी, ठेवून लक्ष
आले अडथळे फिरले न माधारी
झेप घेतली पक्ष्यांपरी आयुष्याच्या अंतावरी!










