प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल – 2026 च्या प्रसिध्दीपत्रकास प्रसिध्दी मिळणेबाबत scolarship exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) एप्रिल – 2026 च्या प्रसिध्दीपत्रकास प्रसिध्दी मिळणेबाबत scolarship exam 

महोदय,

उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दि. 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना दि. 30/12/2025 रोजी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 30 डिसेंबर, 2025 ते 13 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 28 फेब्रुवारी, 2026 पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर प्रसिध्दीपत्रक या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.

सोबत :- प्रसिध्दीपत्रक

Related posts:

Leave a Comment