शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी 2026 ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक प्रसिध्दीपत्रक scolarship exam online application
संदर्भ :
– 1. शिष्यवृत्ती परीक्षा इ. 4 थी व इ. 7 वी 2026 अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/6321, दि. 30/12/2025.
2. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. 02/02/2026
उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7 वी) दिनांक 26 एप्रिल, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 30 डिसेंबर 2025 ते 13 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व नियमित शुल्कासह विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 28 फेब्रुवारी, 2026 पर्यंत व्दितीय व अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. 28 फेब्रुवारी, 2026 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक










