शाळा सुरक्षा प्रतिज्ञा shala surksha pledge 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळा सुरक्षा प्रतिज्ञा shala surksha pledge 

आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ……………. या शाळेचे शिक्षक, पालक व विद्यार्थी प्रतिज्ञा करतो की आमची शाळा आनंदी, सुरक्षित व भयमुक्त असेल. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही आमच्या शाळा प्रमुखांना सहकार्य करू. की जे……..

१. शाळा सुटल्यानंतर कोणतेही मूल शाळेच्या आतील किंवा बाहेरील परिसरात राहिले नसल्याची खात्री केल्यानंतरच शालेय इमारतीतून बाहेर पडतील.

२. विविध शालेय उपक्रमांना शाळेत थांबण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी रितसर शाळा प्रमुखांची परवानगी घेतल्याची खात्री करतील.

३. नियमितरित्या आणि आठवड्यातून किमान एकदा सर्व विद्यार्थी व शिक्षकांना भेटून संवाद साधतील.

४. शिक्षक विद्यार्थ्यांच्या विशेषतः प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या गरजा व अडचणीबाबत अधिक संवेदनशील असल्याची खात्री करतील.

५. शाळेत आरोग्यदायी, स्वच्छ, भितीविरहित आणि दहशतमुक्त वातावरण निर्माण करतील.

६. आपत्तीच्या वेळी शाळा कशा पद्धतीने रिकामी करावी याबाबतचा सराव नियमितपणे घेतील.

७. शाळेत सूचनापेटी / POCSO बॉक्स ठेवतील आणि त्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचना नियमितपणे तपासतील.

Related posts:

Leave a Comment