२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन छोटे मराठी भाषण speech on republic day
सूर्याच्या सोनेरी किरणांची,
उजाडली प्रजासत्ताक दिनांची पहाट
भारत मातेला वंदन करूनी,
करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात….
आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच इतर, मान्यवर, शिक्षकवृंद, आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो आज आपण सर्वजण आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत त्यानिमित्ताने मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी नम्र विनंती करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते.
आजचा हा मंगल दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आजचा दिवस प्रजासत्ताक दिन आहे. २६ जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधान अमलात आणले आणि आपला देश एक लोकशाही प्रजासत्ताक बनला. आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय समता बंधुता या मूल्यांवर यांवर आधारलेले आहे यामुळे आपल्याला यांनी जीवन जगण्याचा हक्क दिले. आज आपण आपल्या वीर शूर सैनिकांना आठवतो, ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले. आजचा दिवस आपल्याला एकतेचे महत्व समजावतो.जरी आपला देश विविधतेने भरलेला आहे तरी आपण सर्व एकत्र येऊन आपल्या भारताला प्रगतिशील बनवू शकतो.
चला, आपण ठरवू या की, देशासाठी जबाबदार नागरिक होऊ आणि देशाच्या उन्नतीसाठी योगदान देऊ.
जय हिंद! जय भारत !
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 1
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 2
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 3
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 4
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 5
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 6
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 7
प्रजासत्ताक दिन इंग्रजी भाषण क्रमांक- 8
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 9
प्रजासत्ताक दिन भाषण क्रमांक- 10











3 thoughts on “२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन छोटे मराठी भाषण speech on republic day ”