इयत्ता 10 वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण 1 ले आनुवंशिकता व उत्क्रांती बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz
1) ……….यांच्या उत्परिवर्तन सिध्दांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला
अ) ह्यूगो दन्व्हिस
ब) वाल्टर सटन
क) ओस्वाल्ड एवरी
ड) वरील सर्व
2) प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNA च्या माध्यमातून होते यालाच म्हणतात
अ)प्रतिलेखन
ब) भाषांतरण
क) सेंट्रल डोग्मा
ड) स्थानांतरण
3) प्रत्येक अमिनो आम्लांकरीता असलेला संकेत तीन न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो त्यालाच असे म्हणतात
अ) प्रतिलेखन.
ब) ट्रीप्लेट कोडॉन
क) भाषांतरण.
ड) उत्परिवर्तन
4) भारतीय वंशाच्या यांनी सर्व 20 अमिनो आम्ला करिता कोडॉन शोधण्याचे कार्य केले
अ) ऋषी कणाद
ब) डॉ स्वामिनाथन
क) डॉ सी व्ही रामन
ड) डॉ हरगोविंद खुराणा
5) जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बंदलाला म्हणतात
अ) प्रतिलेखन.
ब) उत्परिवर्तन
क) भाषांतरण
ड) स्थानांतरण
6) ———— म्हणजे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय
अ) उत्क्रांती
ब) प्रतिलेखन.
क) भाषांतरण
ड) सिकल सेल
7) भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे ———- होय
अ) उत्क्रांती
ब) प्रतिलेखन.
क) भाषांतरण
ड) सिकल सेल
8) सजीवांमधील हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना म्हणतात
अ) प्राजीव विषयक प्रावे
ब) शरीर शास्त्रीय प्रावे
क) अवशेषांगे
ड) वरील सर्व
9) एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C-14 व C-12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते यालाच असे म्हणतात
अ) कार्बनी व्यमापन
ब) शरीर शास्त्रीय पुरावे
क) भ्रूणविज्ञान
ड) वरील सर्व
10) काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून गटांशी संबंध जोडता येतो म्हणून त्यांना असे म्हणतात.
अ) पुरार्जीव विषयक पुरावे
ब) शरीर शास्त्रीय पुरावे
क) अवशेषांग
ड) जोडणारे दुवे
12) डकबिल प्लैटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे तो प्राण्यांशी नाते सांगतो
अ) सस्तन
ब) रंधीय
क) संधीपाद
ड) मत्स्य
13)——— या उत्क्रांती च्या पुराव्यामध्ये भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा अभ्यास केला जातो
अ) अवशेषांग
ब) बाह्यरुपकीय पुरावे
क) भूणविज्ञान
ड) जोडणारे दुवे
14) डार्विन ने नैसर्गिक निवडीचा सिध्दांत या पुस्तकात मांडला
अ) ओरिजन ऑफ स्पेसीज
15) सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात यालाच गुणांचा अनुवंश असे म्हणतात?
अ) लॅमार्कवाद
ब) संपादित
क) जाँती
ड) जातिउद्धव
16) उत्क्रांती मागे त्या त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात अशा विचार
अ) लॅमार्क
ब) वाल्टर सटन
क) ओस्वाल्ड एवरी
ड) मेडल याने मांडला
17) नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास————असे म्हणतात.
अ) जातिउद्धभव
ब) जाती
क) संपादित गुणांचा अनुवंश
ड) अवशेषांगे
18) मानवसदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील एपची
अ) इजिप्तोपीथिकस
ब)निॲण्डरथॉल
क) कुशल मानव
ड) रामापिथिकस
19) मानव हे बुदधिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल
अ) इजिप्तोपीर्थिकस
ब) निॲण्डरथॉल
क) कशल मानव
ड) रामापिथिकस
20) सुमारे 50 हजार वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान
मानव या वर्गाचा सदस्य आहे –
होमो सेपियन
21) DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे होय
अ) प्रतिलेखन.
ब) उत्परिवर्तन
क) भाषांतरण
ड) स्थानांतरण
22) m – RNA वर जसा कोडॉन असतो त्याला पुरक क्रम असलेला अॅटीकोडॉन धारण केलेला t-RNA प्रथिन संश्लेषण करण्यासाठी रायर्बाझोममध्ये आणला जाणे या क्रियेला असे म्हणतात
अ) प्रतिलेखन.
ब) उत्परिवर्तन
क) भाषांतरण
ड) स्थानांतरण
23) m-RNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रीप्लेट कोडॉन च्या अंतराने रायबोझोम सरकत जातो या क्रियेस असे म्हणतात
अ) प्रतिलेखन.
ब)उत्परिवर्तन
क) भाषांतरण
ड) स्थानांतरण
वेगळा घटक ओळखा
1) प्रतिलेखन, भाषांतरन, स्थानांतरण, उत्परिवर्तन
उत्परिवर्तन
2) माकडहाड, आंत्रपुच्छ, अक्कलदाढ, मानवी पाय, अंगावरील केस
मानवी पाय
3) डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या, कानांची रचना, पर्णदेठ, अंगावरील दाट केस
पर्णदेठ
4) पानाचा आकार, कानांची रचना, शिरविण्यास, पानांची रचना, पर्णदेठ
कानांची रचना
5 ) डोळ्यांचे स्थान, हाताच्या हाडांचा आकार, नाकपुड्या, कानांची रचना
हाताच्या हाडांचा आकार
6)मानवी हात, झुरळाचा पंख, मांजराचा पाय, देवमाशाचा पर
झरळाचा पंख
7) जोडणारे दुवे, लॅमार्कवाद, अवशेषांगे, बाह्यरुपकीय पुरावे
लॅमार्कवाद
चूक की बरोबर ते लिहा
1) उत्क्रांती म्हणजे क्रमविकास होय बरोबर
2) सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला बरोबर
3) सुमारे 20 लाख वर्षापूर्वी तौठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला चूक
4 ) उत्क्रांतीमुळे बहपेशीय सजीवापासून जैवविविधता ची जडणघडण झालेली दिसते – चुक
5 ) एका जातौपासून दुसरी नवीन जाते निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो -बरोबर
6) लॅमार्कवाद यालाच इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिध्दांत म्हणतात बरोबर
7) जेव्हा प्राणी व वनस्पती मृत पावतात तेव्हा C-12 ही क्रिया सतत चालू असते चूक
8) अपृष्ठवंशीय प्राण्यापासून पृष्ठवंशीय प्राणी उदभव झाला आहे बरोबर
9) जिवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे बरोबर
10) कानाचे स्नायू हे मानवी अवशेषांग आहे बरोबर
11) एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात बरोबर
12) उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव जमिनीवर निर्माण झाला चूक
13) उत्परिवर्तन या मुळे डाऊन संलक्षण ही जनुकीय विकृती निर्माण होते चूक
प्रश्न फक्त नाव लिहा
1) मी उत्परिवर्तन यांचा सिद्धांत मांडला तर माझे नाव काय ह्युगो द व्हिस
2) मी नाकतोड्या च्या पेशीत गुणसूत्रे असतात याचा शोध लावला तर माझे नाव काय -वालटर सटन
3) 20 अमिनो आम्लांकरीता असलेले कोडॉन चा शोध कोणत्या भारतीय शास्त्रज्ञांनी लावला –हरगोविंद खुराणा
4) मानवाला निरुपयोगी असणारे अवशेषांग आंत्रपुच्छ कोणत्या प्राण्याला उपयोगी आहे -रवंथ करणारे प्राणी
5) माझ्या अंगावर दुग्धग्रंथी व शरीरावर केस आहेत तर मी कोणत्या प्राणी संघाशी नाते सांगतो – सस्तन प्राणी
6) मी मत्स्य वर्गातील असूनसुद्धा फुप्फुसाद्वारे श्वसन करतो तर माझे नाव काय आहे –लंगफिश











…..
…………….