TET मानसशास्त्र सराव प्रश्नपत्रिका tet practice questions paper

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET मानसशास्त्र सराव प्रश्नपत्रिका tet practice questions paper 

व्याकरण शिकल्यानंतर विद्यार्थ्यांनी निबंध लिहिताना विरामचिन्हांचा योग्य वापर करणे, हे कशाचे उदाहरण आहे?

(1) आकलन

(2) ज्ञान

(3) उपयोजन

(4) मूल्यमापन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लांबीच्या काड्या देतात आणि त्यांना ‘सर्वात लहान ते सर्वात मोठी’ अशा क्रमाने मांडायला सांगतात. जर एखादा विद्यार्थी ही कृती अचूकपणे करत असेल, तर पियाजेच्या मते तो कोणत्या अवस्थेत आहे आणि त्याने कोणते तत्त्व आत्मसात केले आहे?

(1) संबेदीकारक अवस्था वस्तुसातत्य

(2) क्रियापूर्व अवस्था प्रतिकात्मक विचार

(3) अमूर्त क्रियाकाल अवस्था श्रेणीबद्धता

(4) औपचारिक क्रियात्मक अवस्था निगमनात्मक तर्क

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘अनिव आशयाचे क्रमनिहाय सादरीकरण’ या पायरीचा वापर करताना शिक्षकाने प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर भर देणे आवश्यक आहे?

(1) माहिती कोणत्याही क्रमाने देणे.

(2) कठीण संकल्पना आधी आणि सोप्या संकल्पना नंतर शिकवणे,

(3) आशयाची मांडणी तर्कसंगत आणि एकमेकांशी जोडलेल्या स्वरूपात करणे.

(4) विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील मजकुर बाचायला लावणे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेली व्यक्ती आपल्या मधुर आवाजाच्या जोरावर प्रसिद्ध गायक बनते.’ हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते?

(1) प्रत्यक्ष प्रतिपुरण

(2) अप्रत्यक्ष प्रतिपूरण

(3) तादात्म्य

(4) उदात्तीकरण

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

प्रत्यक्ष वस्तू समोर नसतानाही तिचे मनात चित्र उभे राहणे, याला मानसशास्त्रात काय म्हणतात?

(1) अवबोध

(2) प्रतिमा

(3) संबोध

(4) कल्पना

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये वाढणारा ताण कमी करण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणता उपाय सुचवणे ‘अनुकूल’ नाही?

(1) अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे,

(2) परीक्षेच्या निकालाचा सतत विचार करत राहणे.

(3) श्रासाचे व्यायाम किंवा ध्यान धारणा करणे.

(4) कठीण विषय लहान लहान भागात विभागून शिकणे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

शाळेत साजरा केला जाणारा ‘स्नेहसंमेलन’ (Gathering) हा कार्यक्रग कोणत्या आंतरक्रियेला चालना देतो?

(1) केवळ शारीरिक आंतरक्रिया

(2) वैज्ञानिक आंतरक्रिया

(3) सामाजिक आणि सांस्कृतिक आंतरक्रिया

(4) आर्थिक आंतरक्रिया

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘अध्ययनात बाह्यजगताचे वैयक्तिक पातळीवर अर्थनिर्वचन (Interpretation) केले जाते’, या मेरिल यांच्या गृहीतकाचा अर्थ काय?

(1) प्रत्येक विद्यार्थी पुस्तकातील माहितीचे पाठांतर करतो.

(2) प्रत्येक विद्यार्थी आपल्या पूर्वअनुभवानुसार माहितीला स्वताचा एक वेगळा अर्थ देतो.

(3) जगातील सर्व माहिती शिक्षकाने सांगितल्याप्रमाणेच समजून घ्यावी लागते.

(4) बाड़ा जगाचा अध्ययनाशी कोणताही संबंध नसतो.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

जेव्हा एखादा शिक्षक ‘आशय आणि सादरीकरण’ यावर जास्त लक्ष देतो, तेव्हा तो कशाचा वापर करत असतो?

(1) अध्यापन कार्यनीती

(2) अध्यापन पद्धती

(3) मुल्यमापन तंत्र

(4) शैक्षणिक व्यवस्थापन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यक्तीचे दिसणे, व्यक्तीचा पोशाख, व्यक्तीचे चालणे, बोलणे, व्यक्तीच्या कृती, कौशल्ये आणि व्यक्तीचे आरोग्य होय,’ ही प्रसिद्ध व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे?

(1) गॉर्डन ऑलपोर्ट

(2) जोन्स

(3) आर. बी. कॅटेल

(4) नॉर्मन मन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

जेव्हा एखादा व्यक्ती रागाच्या भरात कोणाला तरी मारण्याऐवजी खेळाच्या मैदानात जाऊन जोराने धावतो, तेव्हा हे कोणत्या सहजप्रवृत्तीचे उदात्तीकरण असू शकते?

(1) पलायन

(2) युयुत्सा

(3) कुतूहल

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

मूल्यमापन त्रिकोणातील ‘मूल्यमापन’ ही पायरी आपल्याला काय दर्शवते?

(1) विद्यार्थ्याने किती पाठांतर केले आहे.

(2) शरणागती

(3) शिक्षकाने किती तास शिकवले आहे.

(4) ठरवलेली शैक्षणिक उद्दिष्टे कोणत्या मर्यादिपर्यंत साध्य झाली आहेत.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

‘समोर अनेक गोष्टी असताना एका विशिष्ट उद्दीपकावर चित्त एकाग्र करण्याची मनाची धडपड’ म्हणजे काय ?

(1) संवेदना

(2) धारणा

(3) अवधान

(4) विस्मरण

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे पाठांतर करून ती लक्षात ठेवतो, तेव्हा त्या स्मरणाला काय संबोधले जाते?

(1) बौद्धिक स्मरण

(2) निष्क्रिय स्मरण

(3) यांत्रिक स्मरण

(4) व्यक्तिगत स्मरण

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘मंगोलिझम’ (Down Syndrome) या मतिमंदत्वाच्या प्रकाराचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते आहे?

(1) गॅलॅक्टोज साखरेचे अपचन

(2) 21 व्या गुणसूत्राच्या नोडीमध्ये एक जास्तीचे गुणसूत्र असणे.

(3) गर्भावस्थेत आईला झालेली दुखापत.

(4) मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

जे.पी. गिलफोर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्ता संरचनेत (SOI) एकूण तीन मिती (Dimensions) सांगितल्या आहेत,

त्यापैकी खालील योग्य गट कोणता?

(1) अनुवंशिकता, वातावरण आणि वय

(2) क्रिया, आशय आणि निर्मिती

(4) ज्ञान, आकलन आणि उपयोजन

(3) शब्द, अंक आणि आकृत्या

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

गणित विषयातील एखादा नियम सांगण्यापूर्वी शिक्षकाने अनेक उदाहरणे सोडवून घेतली आणि त्यावरून मुलांनी स्वतः

नियम तयार केला. हे कोणत्या सूत्राचे उदाहरण आहे?

(1) मूर्तीकडून अमूर्ताकडे

(2) ज्ञाताकडून अज्ञाताकडे

(3) पूर्णाहून अंशाकडे

(4) विशिष्टाकडून सामान्याकडे

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

पाव्हलॉव्ह यांच्या ‘अभिजात अभिसंधान’ (Classical Conditioning) उपपत्तीत ‘लाळ गळणे’ हा नैसर्गिक प्रतिसाद कोणत्या कृत्रिम उद्दीपकाशी जोडला गेला?

(1) अत्र

(2) प्रकाश

(3) घंटेचा आवाज

(4) विजेचा झटका

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

‘अध्ययन म्हणजे अनुभवामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल होय’, ही अध्ययनाची व्याख्या प्रामुख्याने कोणत्या

विचारप्रवाहात येते?

(1) ज्ञानरचनावाद

(2) वर्तनवाद

(3) मानवतावाद

‘बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला आहे?

(1) अल्फ्रेड बिने

(2) एडवर्ड वॉर्नडाईक

(3) चार्ल्स स्पीअरमन

(4) मर्मदृष्टीवाद

वरील प्रश्नाच्या अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

 

Related posts:

Leave a Comment