TET शिक्षक पात्रता परीक्षा tet teacher eligibility test 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET शिक्षक पात्रता परीक्षा tet teacher eligibility test 

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महिला उमेदवारांना दुपट्टा, बुरखा व हिजाब वापरासंबंधी खुलासा करणेबाबत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 28 जून, 2026 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परीक्षा केंद्रावर सर्व वर्ग खोल्यांमध्ये Live सीसीटीव्हीचा वापर करण्यात येणार असल्याने संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसावा यासाठी दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब व दुपट्टा वापरण्यास परवानगी द्यावी असे मेल प्राप्त झाले आहेत. सदर मुद्द्‌यावर पुढीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे:-

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रीट याचिका WPL क्र. 17737 / 24, Zainab Abdul Qayyum Choudhary Vs Chembur Trombay Edu. Societys, Chembur Trombay Education Society’s, N.G. Acharya and D.K. Marathe College of Art, Science and Commerce, Chembur, Mumbai, आदेश दि.26/06/2024 मध्ये ९ महिला विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या ड्रेस कोड सूचनांना आव्हान दिले, ज्यामध्ये हिजाब, बुरखा, नकाब आणि इतर धार्मिक ओळख दर्शवणारे पोशाख कॅम्पसमध्ये प्रतिबंधित करण्यात आले होते. सदर न्याय निर्णयामध्ये मा. उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे :-

In the writ petition, it has been pleaded that the petitioners have been donning a Hijab and/or Nakab for last few years. The pleadings in the writ petition to support the plea that donning of a Hijab or Nakab is an essential religious practice however are insufficient. Except for stating that the same constitutes an essential religious practice on the basis of the English translation of Kanz-ul-Iman and Suman Abu Dawud, there is no material placed to uphold the petitioners’ contention that donning of Hijab and Nakab is an essential religious practice. The contention in that regard therefore fails.

For the aforesaid reasons, we are satisfied that the Instructions issued by the College under which a dress code has been prescribed for its students does

not suffer from any infirmity so as to violate provisions of Article 19(1)(a) and Article 25 of the Constitution of India.

भारतामधील जवळजवळ सर्व मोठ्या स्पर्धा परीक्षा UPSC, SSC, IBPS, SBI, RRB, GATE, CLAT, CA, CS, CMA इ. सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा, MPSC, GPSC, BPSC, UPPSC सारख्या राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षेमध्ये चेहरा झाकणारे कपडे दुपट्टा, बुरखा, स्कार्फ, टोपी, गॉगल्स यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कारण ओळख पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि संपूर्ण परीक्षा कालावधीत सीसीटीव्ही पडताळणी प्रक्रियेमध्ये चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असते. परीक्षांमध्ये चेहऱ्यावरील हिजाब, बुरखा किंवा दुपट्टा यावर बंदी घालण्यामागे मुख्य उद्देश Live CCTV च्या माध्यमातून संपूर्ण परीक्षा कालावधीत सर्व उमेदवारांवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणे, ओळख पडताळणी सुलभ करणे व पर्यायाने परीक्षेमधील पारदर्शकता व विश्वासहर्ता कायम ठेवणे हा आहे.

परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार उदा. मोबाईल बाळगणे, मोबाईल द्वारे प्रश्नपत्रिका व्हाट्सअप टेलिग्राम द्वारे बाहेर पाठवणे, मोबाईल दद्वारे उत्तरे प्राप्त करून घेणे, कानामध्ये अतिशय लहान आकाराचे वायफाय ब्लूटूथ ठेवणे, या व अशा अनेक प्रकारच्या युक्त्या आजकाल परीक्षेमध्ये गैरप्रकारासाठी वापरण्यात येत असतात. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच उमेदवारांचा संपूर्ण चेहरा, मानेच्या वरील संपूर्ण भाग म्हणजेच तोंड, कान हे अवयव स्पष्ट दिसणे आवश्यक आहेत, जेणेकरून गैरप्रकाराबाबत संशय घेण्यास वाव राहणार नाही. तोंड झाकून ठेवल्यास, कोण एकमेकांशी बोलत आहे? हे देखील कळणार नाही. तसेच परीक्षा केंद्रामध्ये संशयावरुन पडताळणीसाठी एखा‌द्या महिला उमेदवारास चेहरा दाखविण्यास सांगितले, तर कदाचित त्यामधून वेगळाच प्रश्न उ‌द्भवू शकतो.

नुकत्याच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या डीएलएड व संगणक लघुलेखन परीक्षेमध्ये उमेदवारांनी दुपट्टा / बुरख्यामध्ये मोबाईल लपवून परीक्षा केंद्रामध्ये आणल्याचे व वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा ही अतिशय संवेदनशील परीक्षा असून AI, ब्लूटूथ डिवाइस, शर्टच्या बटना एवढे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर, इत्यादी बाबी लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ न देणे हे अतिशय आव्हानात्मक झालेले आहे. परीक्षा पारदर्शक व्हावी व सर्व प्रकारच्या फेरप्रकारांना आळा घालता यावा, यासाठी सर्वच 6 लक्ष उमेदवारांचे चेहरे Live CCTV मध्ये स्पष्ट दिसणे गरजेचे आहे.

एकंदरीत वरील सर्व मुद्दे लक्षात घेता शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील, तथापि परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर वर्ग खोलीमध्ये चेहरा मात्र पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये स्पष्ट दिसला पाहिजे, यासाठी मानेच्या वर, म्हणजेच कानावर, डोक्यावर किंवा तोंडावर/चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कपडा / आवरण असता कामा नये हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात येत आहे.

शासन परिपत्रक pdf download

Related posts:

Leave a Comment