संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येणा-या थकीत देयकाबाबत सन २०२५-२६ मुदतवाढ thakit deyak paripatrak
सन २०२५-२६. मुदतवाढ.
संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.
२) संचालनालयाचे पत्र क. शिसंमा/२०२५-२६/टि-७/चकीत/ऑनलाईन मुदतवाढ/५८५९ दिनांक-२१/०१/२०२६.
विषयांकित प्रकरणी संदर्भ पत्राचे तसेच त्यामध्ये नमूद प्रत्येक संदर्भाचे अवलोकन करावे. संदर्भिय शासन निर्णयानुसार प्रलचित/चकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. मुख्याध्यापक, अधीक्षक वेतन पथक, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी-विभागीय शिक्षण उपसंचालक, व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत पूर्ण तपासणी करून तो देयके नियमानुसार देय असल्याची खात्री करून सदर देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर होणे आवश्यक आहे.
संदर्भिय शासन निर्णयानुसार प्रलंबित चकीत देयके संचालनालयास मान्यतेसाठी सादर करताना लाभार्थी कर्मचा-याची वैयक्तिक मान्यतेची खात्री करणे, ज्या कालावधीतील त्यांचे देयका आहे त्या कालावधीत सदर व्यक्तीने खरोखरच त्या शाळेत/प्राथमिक शाळेत काम केले होते, त्याची मान्यता बैंक डेटेड केलेली नाही याची खातरजमा करणे, प्रकरणाची डिजिटलायजेशन मध्ये असणा-या दस्तावेजानुसार पडताळणी करणे, मान्यतेचे मूळ दस्तावेज वेतन पथक/शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आहे का? या बाबत खातरजमा करूनच देयके पुढे पाठविण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
जर थकीत देवकातील लाभार्थी कर्मचा-याची एसआयटी तपासणी मान्यता चुकीची निघाली तर देयके सादर करणा-या संबंधित लाभार्थी कर्मचारी, मुख्याध्यापक, कर्मचारी, अधिकारी यांचेवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश या पत्रानुसार देण्यात येत आहेत.
सबब अधीक्षक घेतन पथक (प्राथमिक)/ शिक्षणाधिकारी प्राथमिक/विभागीय शिक्षण उपसंचालक यांना चकीत देवकाची आर्थिक व प्रशासकीय चौफेर तपासणी करूनच देयके संचालनालयास सादर करणेसाठी दिनांक १०/०२/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.











