यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणीबाबत udise plus pranali paripatrak
संदर्भ :
१) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे क्र. २३-B/२०२६-Stat -Part (१) दि. ०८ सप्टेंबर, २०२६ रोजीच पत्र.
२) शिक्षणाधिकारी (प्रा.) जि.प. बीड यांचे जा.क्र. सशि/UDISE PLUS-२०२५/१२३५/२०२६-२७ दि. ०२ ऑगस्ट, २०२६ रोजीच पत्र.
३) श्री. अविनाश ताकवले, अध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक सेल यांचे जा.क्र. राशिसे/
२६-२७ दि. ०१ सप्टेंबर, २०२६ रोजीच पत्र.
४) श्री. हारिश शिंदे, संस्थापक अध्यक्ष, Maharashtra English School Trustees Association (F), सोलापूर यांचे जा.क्र.३५/२०२६ दि. १० सप्टेंबर, २०२६ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत इयत्ता २री ते १२वीपर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी तालुका स्तरावरून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार दि. ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये तालुका स्तरावरून इयत्ता २री ते १२वीपर्यंत विद्यार्थ्यांचे नोंदणी पूर्ण करून घेण्यात यावे. त्याकरिता संदर्भिय क्र. १ नुसार केंद्र शासनाने मुख्याध्यापकांकडून SO२ प्रपत्र भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार सदरचे प्रपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांकडून भरून घेण्यात यावे. तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी झालेली नसल्याची खात्री करून घेण्यात यावे. त्यानंतरच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी तालुका स्तरावरील MIS-Coordinator/Data Entry Operator यांच्याकडे नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर SO२ प्रपत्र तालुका स्तरावर जतन करून ठेवण्यात यावे.
इयत्ता २री ते १२वीपर्यंत च्या विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदणी करण्याची कार्यवाही दि. ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ केंद्र शासनाकडून देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच, जिल्ह्यातील इयत्ता २री ते १२वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंद झाली आहे, याची खात्री करून घेण्यात यावी.
सोबत : केंद्र शासनाचे SO२ प्रपत्र.










