इयत्ता 6 वी विषय कला वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta sahavi vishay kala
इयत्ता सहावी विषय कला वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
१. संवाद फेकिचे कौशल्य उत्तन आहे.
२. आवाजात ओहाकता ठेवून बोलतो.
३. पुस्तकातील गीतांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.
४. कथा सांगतांना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो.
५. मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो.
६. मातीपासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.
७. नाटकाची पुस्तके वाचतो.
८. पाहिलेल्या व्यक्तीच्या हुबेहूब नकाला करतो.
९. एकदा ऐकलेले गीत जसेच्या टचेस पूर्ण म्हणतो.
१०. वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो.
११. प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून सहभाग घेतो.
१२. स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.
१३. वस्तूविषयी योग्य विश्लेशानासह वर्गीकरणकरतो.
१४. सर्वांना उपयोगी वस्तूबाबत माहिती घेतो.
१५. नृत्याची विशेष आवड आहे
१६. नृत्य सुंदर करतो.
१७. चित्रकलेत फारच रुची घेतो.
१८. आकर्षक चित्रे काढतो.
१९. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो.
२०. हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्यासारखे ठळक काढतो.
२१. योग्य हावभावासह संवाद कौशल्यपूर्ण रीतीने साधतो.
२२. देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.
२३. पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा दाखवतो.
२४. सराव करतांना अगदी रममाण होऊन सराव करतो.
२५. चित्राची विविध प्रकार अचूकपणे ओळखतो व माहिती देतो.
२६. चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.
२७. नृत्याप्रकाराची नवे अचूक व स्पष्ट सांगतो.
२८. माहिती सांगतो व उदाहरणासह स्पष्ट करतो.
२९. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.
३०. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.
३१. सुचविलेल्या विषयवार अतिशय सुंदर रीतीने रेखाटन करतो.
३२. सुचविलेल्या विषयावर जलद व प्रमाणबद्ध रेखाटन करतो.
33. चित्रात अतिशय सुंदर व आकर्षक रंग भरतो.
३४. सुचविलेल्या हातांच्या मुद्रा सुंदर प्रात्यक्षिक करतो.
३५. सुचविलेल्या हातांच्या नुत्याच्या प्रकारचे सुंदर प्रात्यक्षिक करतो.
३६. छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना हसवितो.
३७. नृत्याप्रकाराची माहिती जलद व अचूक सांगतो.
३८. सुचविलेल्या विविध कलाकृतींचे अचूक माहिती सांगतो.
३९. सुशोभनासाठी आवश्यक सर्व घटकांची जलद नावे सांगतो.
४०. सुशोभनासाठी आवश्यक सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो.
४१. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची नावे देतो.
४२. सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.
४३. सुचविलेल्या कवितेचे स्पष्ट उच्चार करतो.
४४. सुचविलेल्या गीताचे योग्य कृतीसह सादर करतो.
४५. चित्रात सुंदर रंग भरतो.
४६. रंगकाम अतिजलद पण उत्कृष्ट करतो.
४७. चित्र कोठे लावावे या बाबत मार्गदर्शन करतो.
४८. सुचविलेल्या हालचालींचे सुंदर प्रात्यक्षिक करतो.
४९. सुचविलेल्या प्रसंगाचे योग्य हावभावासह सादरीकरण करतो.
५०. कृतीची प्रत्येक पायरी समजावून देतो.
अडथळ्याच्या नोंदी
१. चित्रात रंग भरता येत नाही.
२. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.
३. दिलेल्या साहित्यास चुकीच्या पद्धतीने वापरतो.
४. शालेय सुशोभन करतांना कामात रस घेत नाही.
५. सुचविलेल्या विषयावर चित्र काढता येत नाही.
६. वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
७. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नाही.
८. सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही.
९. चित्र काढण्याचा खूपच कंटाळा करतो.
१०. गाणे म्हणतांना खूपच लाजतो.
११. नृत्याची कृती करतंना फारच लाजतो.
१२. कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो.
१३. कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.
१४. कृती कशी व का करावी याबाबत संभ्रमात पडतो.
१५. मातीकामात जराही रस नाही.
१६. मातीकाम करतांना पाणी व माती यांचे प्रमाण समाजात नाही.
१७. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही.
१८. इतरजण व्यवस्थित कृती करतांना त्यांना हसतो.
१९. इतरांना कृती करतांना पाहून चिडवतो.
२०. इतरांना लक्षपूर्वक कृती करू देत नाही,
२१. कागदकाम करतांना खूप कागद वाया घालवतो.
२२. चित्र रंगवतांना खूप रंग वाया घालवतो.
२३. जीवनातील कलेचे महत्व जाणत नाही.
२४. सजावटीसाठी आवश्यक नसलेले साहित्य सांगतो.
२५. चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाही.
२६. चित्राचे विविध प्रकार ओळखतांना गोंधळतो.
२७. सुचविलेल्या विविध उपयोगाची माहिती सांगता येत नाही.
२८. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक साहित्य सांगता येत नाही.
२९. नृत्याप्रकाराची माहिती चुकीची सांगतो.
३०. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.
३१. सुचविलेल्या मातीच्या वस्तू बनविण्यात रस नाही.
३२. सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.
३३. सुचविलेल्या कवितेचे कृती करतांना लाजतो.
३४. सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करता येत नाही.
३५. सुचविलेल्या गीताचे कृतियुक्त सादरीकरण करता येत नाही.
३६. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत नाही.
३७. सुचविलेल्या कलाकृतींची माहिती सांगता येत नाही.
३८. सुचविलेल्या संवादाचे सादरीकरण करता येत नाही.










