छत्रपती संभाजीनगर विभागस्तरीय शिक्षण व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन बाबत vibhagstariy spardha
1. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेकडील जा.क्र. राशैसंवप्रप/शिक्षक स्पर्धा/2025-26, दिनांक 10/10/2025 चे पत्र
2. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे वांचे दि. 14/10/2025 रोजीच्या Online बैठकीमधील सूचना.
3. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. जिशिप्रसं/शिक्षकस्पर्धा/21025-26 DIETCS-13013/2/2025-O/O PRINCIPAL-DIET CHH SAMBHAJINAGAR/दिनांक 33 10.2025
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन माहे नोव्हेंबर मध्ये 2025 पूर्ण होत आहे. विभागस्तरीय स्पर्धांचे आयोजन छत्रपती संभाजीनगर विभागाच्या जिल्ह्यांना विभागून देण्यात आलेले आहे. याबाबत आपणास या पूर्वीच पत्राद्वारे कळविण्यात आले होते. मा. विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासमवेत झालेल्या दिनांक 19.11.2025 च्या Online बैठकीतील चर्चेनुसार विभागाचे नियोजन अंतिम करण्यात आले आहे. जिल्हानिहाय देण्यात आलेल्या स्पर्धा, आयोजनस्थळ आणि स्पर्धा
समन्वयक यांची यादी सोबत देण्यात येत आहे.
एकूण 42 स्पर्धापैकी विभागस्तर स्पर्धेसाठी खालील प्रमाणे स्पर्धक पात्र ठरणार आहेत.
क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक क्रीडा प्रकारात खो खो आणि हॉलीबॉल या स्पर्धेसाठी जिल्हास्तर एक संघ पाठविण्यात यावा. या दोन्ही संचात 50% महिला आणि 50% पुरुष खेळाडूंचा समावेश अनिवार्य आहे.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, लांबउडी आणि बॅडमिंटन या वैयक्तिक क्रीडा प्रकारात केवळ तालुकास्तरावरील पुरुष आणि महिला गटात प्रथम येणारे स्पर्धक विभागस्तरासाठी पात्र असतील.
क्रीडा प्रकार वगळता, उर्वरित 41 स्पर्धाप्रकारात केवळ तालुकास्तरावरील स्पर्धेत प्रथम येणारा स्पर्धक विभागस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र असेल.
आपल्या जिल्हातील सर्व विजेत्या स्पर्धकांना विभागस्तर स्पर्धेचे स्थळ, दिनांक आणि स्पर्धा समन्वयक यांच्याबाबत माहिती स्पर्धेपूर्वी एक आठवडा देण्यात यावी. या बाबतीत गटशिक्षणाधिकारी यांना या पत्रासोबत दिलेले नियोजन त्वरित कळविण्यात यावे.
संदर्भ क्र.। नुसार प्रत्येक शिक्षकास केवळ एकाच स्पर्धेत सहभाग नोंदविता येईल. राज्यस्तरावर स्पर्धेच्या लिंकमध्ये संबधित शिक्षकाची नोंदणी आवश्यक आहे.
विभाग स्तरावर प्रथम 5 क्रमांकाचे विजेते राज्य स्तरावर सहभागासाठी पात्र राहतील, स्पर्धा आयोजक जिल्ह्याने प्रथम 5 स्पर्धकाची निवड करून सदर निवड यादी राज्यस्तर स्पर्धा आयोजक जिल्ह्यास आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांना पाठवावी.
प्रत्येक स्पर्धेसाठी तीन परीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, परीक्षकांचा BIODATA तपासून परीक्षक सक्षम आहेत याची खात्री करावी.
आयोजक जिल्ह्याने स्पर्धा नियमावली नुसार उद्भवणाऱ्या सर्व सूचना व तक्रारी हाताळाव्यात. सर्व स्तरावर स्पर्धा निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतील याचाबत दक्षता घ्यावी.
सोबत जोडलेल्या नियोनानुसार आपल्या जिल्ह्यात विभागस्तरीय स्पर्धा आयोजित होतील याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करावी,










