दि.०१.११.२००५ पुर्वी विनाअनुदानित किंवा अंशः अनुदानित तुकडीवर नियुक्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत vinaanudanit niyukta shikshak karmachari juni penshan yojana
संदर्भः मा. उच्च न्यायालया मुंबई यांचे कडील याचीका क्रमांक २३४५/२०१४ चा दि.२७.०२.२०२५ रोजीचा आदेश
मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील उपरोक्त आदेशानुसार दि.०१.११.२००५ पूर्वी विनाअनुदानित किंवा अंशः अनुदानित पदावरील नियुक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत कगदपत्रांची पडताळणी करून त्यांना जुनी पेन्शन योजना लागु करता येईल किंवा कसे याबाबत वरीष्ठ स्तरावरून निर्णय घेणेबाबत आदेशीत केलेले आहेत.
सोबत, सादर केलेल्या यादीमधील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकांच्या उपरोक्त प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या असल्यामुळे, सोबत सादर केलेल्य तक्यामध्ये माध्यमिक विद्यालयांनी ज्या शिक्षकेत्तर / शिक्षक कर्मचाऱ्यांची नावे नमूद आहेत त्या शिक्षकांची माहिती भरून आवश्यक त्या कागदपत्रांसह तात्काळ या कार्यालयाकडे दोन दिवसांत सादर करावी.
सदर शिक्षकांची माहिती सादर केली नाही आणि संबंधित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेपासुन वंछित राहिल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी संबंधित प्राचार्य / मुख्याध्यापक यांची राहील. सोबत : वरील प्रमाणे










