बालसंगोपन योजनेचा एकल विद्यार्थ्यांना लाभ : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे balsangopan yojana 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालसंगोपन योजनेचा एकल विद्यार्थ्यांना लाभ : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे balsangopan yojana

खामखेडा:- ता.18 अनाथ, निराश्रित, बेघर १८ वर्षापर्यंतच्या गरजू मुला-मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा २२५० रुपयांचे परिपोषण अनुदान दिले जाते. राज्यात २ लाख २३ हजारांहून विद्यार्थ्यांपैकी निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. :

श्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. शिक्षण

विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, शालेय शिक्षण आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, राज्यात एकल पालक असलेल्या बालकांची संख्या मोठी असून अनेक बालके या योजनेपासून वंचित आहेत.

अशा निकषांची पूर्तता करणाऱ्या विशेषत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन महिला व बालविकास विभागाकडे सादर करण्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असे कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts:

Leave a Comment