निसर्गाला अनुकूल व पर्यावरणविषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टीकोन शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व समूदायामध्ये विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून पर्यावरण विषयक उपक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत eco club regarding paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निसर्गाला अनुकूल व पर्यावरणविषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टीकोन शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये व समूदायामध्ये विकसित करण्यासाठी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून पर्यावरण विषयक उपक्रम शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत eco club regarding paripatrak 

संदर्भ

: १) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको/२/२०२४-२५/१४४५,

दि. २२/०५/२०२५ २) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इकोक्लब (Plant४mother)/२

/२०२४-२५/१७७१, दि. २४/०६/२०२५

३) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको (Plant४mother)२/२०२४-२५/१९९५, दि.०९/०५/२०२५

४) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको

(Plant४mother)२/२०२४-२५/२२६४, दि. २५/०७/२०२५ ५) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको

(Plant mother)/२/२०२४-२५/२२९१, दि. २८/०७/२०२५ ६) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको

(Plant४mother)२/२०२४-२५/२३६७, दि. ०१/०८/२०२५ ७) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२ २०२४-२५/२८४८, दि. २३/०९/२०२५

८) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२ २०२४-२५/३०५०, दि. ०९/१०/२०२५

९) केंद्रशासनामार्फत आयोजित V.C. दिनांक १६/१२/२०२५ १०) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२

२०२४-२५/३८४३, दि. १८/१२/२०२५

११) या कार्यालयाचे पत्र क्रमांक मप्राशिप/सशि/इको क्लब/२ २०२४-२५/३९४५, दि. २६/१२/२०२५

१२) केंद्रशासनाकडून प्राप्त व्हाटस अॅप संदेश दि. ०४/०२/२०२६

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने, केंद्र शासनाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यासाठी १०० % सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इको क्लब स्थापन करून त्याबाबतची माहिती http://ecoclubs.education.gov.in या पोर्टलवर अपलोड करणेबाबत संदर्भिय पत्रांन्चये आपणांस कळविण्यात आले होते.

मात्र, इको क्लब फॉर मिशन जागतिक पर्यावरणीय उपक्रम २०२५-२६ पोर्टलवर दि. ०४/०२/२०२६ रोजीचे फक्त ७५.४१% शाळांमध्ये इको क्लबची स्थापना झालेली असून २४.५९% शाळांमध्ये इको क्लब स्थापन नसल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः सातारा, ठाणे, मुंबई शहर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नागपूर, पुणे व धाराशिव या जिल्हयांत ६५% पेक्षा कमी शाळांमध्ये इको क्लब मंच स्थापन केलेले दिसून येत आहेत.

केंद्रशासनाकडून इको क्लब फॉर मिशन लाईफ याबाबत आढावा घेण्यात येत असतो. राज्यात १००% शाळांमध्ये इको क्लब स्थापन न झाल्यामुळे सह सचिव, भारत सरकार यांचेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून इको क्लब स्थापन झालेले नसल्याबाबतची कारणांबाबतही विचारणा करीत आहेत. इको क्लब स्थापन झालेले नसल्याबाबतची कारणे या कार्यालयास सादर करणेबाबत सर्व जिल्हयांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.

दि. १५/०२/२०२६ पर्यंत इको क्लब फॉर मिशन लाईफबाबतचे १०० % उद्दिष्टे पूर्ण करणेबाबत सहसचिव, भारत सरकार यांचेकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत.

यानुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, कार्यक्षेत्रातील ज्या शाळांमध्ये इको क्लब मंच स्थापन झालेले नाहीत अशा शाळांमध्ये प्राधान्याने इको क्लब मंचाची स्थापना करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. इको क्लब फॉर मिशन लाईफवाबतचे १००% उद्दिष्टे पूर्ण होईल, असे पाहावे.

Related posts:

Leave a Comment