TET प्रश्नसंच निर्मिती कार्यशाळेच्या कामकाजासाठी तज्त शिक्षकांची नावे मिळणेबाबत teacher eligibility test
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या गोपनीय कामकाजासाठी तज्ज्ञ शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करावयाची आहे. तरी कार्यशाळेसाठी तज्ज्ञ शिक्षक म्हणून आपल्याकडून मराठी, इंग्रजी, उर्दू, माध्यमासह बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराथी, सिंधी, हिंदी विषयाचे ज्ञान असलेल्या तज्ञांची आवश्यकता आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सदर माध्यमांच्या तज्ञांची यादी या प्रमाणे. (तज्ञांचे संपूर्ण नाव, त्यांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, शैक्षणिक पात्रता व त्यांचा विषय इ.) माहिती एक्सेल मध्ये सॉफ्ट कॉपी स्वरूपात चाबी किंवा खाली दिलेल्या विहित नमुन्यामध्ये सदर माहिती भरून bpvmscepune2023@gmail.com या मेल आयडी वर पाठवण्यात यावी व समीक्षणासाठी अधिव्याख्याता व जेष्ठ अधिव्याख्याता यांना सदर कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत सूचित करावे.
उपरोक्त माहिती २ दिवसात मिळावी ही विनंती. कार्यशाळेसाठी उपस्थिती कालावधीत तज्दा शिक्षकांस शासकीय दरानुसार प्रवास, दैनिक भत्ता व मेहनताना काम संपल्यानंतर अदा करण्यात येईल.









