बालकाच्या विकासावस्था principales of child development 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालकाच्या विकासावस्था principales of child development 

जन्मपूर्व अवस्था

डॉ. अर्नेस्ट जोन्स यांनी विकासासंदर्भात जन्मपूर्व अवस्था व जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण केले आहे. आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस बालकाचा विकास होत असतो. आईचे स्वास्थ्य त्यात शारीरिक स्वास्थ्य, समतोल आहार, सभोवतालचे वातावरण इ. चा बालकाच्या विकासावर परिणाम होत असतो.

‘आईच्या गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या अवस्थेला जन्मपूर्व -अवस्था असे म्हणतात.’ जिवाची निर्मिती ही एका पेशीपासून होते. ही पेशी दोन जननपेशींच्या मिलनातून निर्माण होते.

जन्मोत्तर अवस्था खालील प्रमाणे

यामध्ये बालकाच्या जन्मानंतरच्या विविध अवस्थांचा समावेश होतो.

1. नवजातावस्था

जन्मापासून ते एक महिन्यापर्यंतच्या कार्यकालास नवजातावस्था असे म्हणतात. जन्मल्यानंतर आई पासून बालक

स्वतंत्र होते. श्वसन, रक्ताभिसरण, पचन इ. बाबतीत ते स्वतंत्र होते. बालकाच्या डोक्याचा आकार घडापेक्षा मोठा असतो.

विकासाची दिशा

1) डोक्यापासून पायाकडे विकास होत असतो.

जसे सुरुवातीला डोक्याचा, नंतर धड, नंतर हात पाय इत्यादीचा विकास होत असतो.

2) विकासाची दिशा ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे होते.

जसे – मूल सुरुवातीला एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे पाहते, नंतर त्याच्या अवयवाकडे भागाकडे पाहते म्हणजेच ते अगोदर घोडा पाहते, नंतर त्याचे तोंड पाय. इ. अवयव पाहते.

3) परावलंबी-स्वावलंबी-परावलंबी म्हणजेच परावलंबनाकडून स्वावलंबनाकडे, नंतर पुन्हा परावलंबनाकडे विकास होतो.

जसे लहान मूल अगोदर परावलंबी असते, नंतर ते स्वावलंबी होते. वृध्दावस्थेत ते पुन्हा परावलंबी होते.

विकास प्रक्रियेची तत्त्वे व वैशिष्ट्ये

➡️विविध अनुभवांतून बालकाचा विकास होतो.

➡️विकास संकलित स्वरूपात दिसतो.

➡️विकास क्रमबध्द असतो.

➡️विकासाची प्रत्येकाची गती वेगळी असते.

➡️विकासाच्या अवस्थेतील कालावधीसंदर्भात विविध

➡️मानसशास्त्रांज्ञामध्ये मतभिन्नता आहे.

➡️विकासाची एक अवस्था कधी संपते व दुसरी नेमकी कधी सुरू होते हे निश्चितपणे सांगता येत नाही.

➡️विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे.

➡️प्रत्येकामध्ये विकासाची गती वेगवेगळी असते.

➡️विकासाचा वेग वेगवेगळ्या अवस्थेत सारखा नसतो.

➡️विकासाची अंगे ही परस्पराशी संबंधित असतात.

जसे शारीरिक, मानसिक, भावनिक इ.

2. शैशवावस्था (1) महिना ते 6 वर्षे)

नवजातावस्थेनंतरची ही अवस्था जन्मल्यानंतर साधारण एक महिन्यापासून सुरू होते. ती 6 वर्षांपर्यंत असते. या अवस्थेमध्ये पूर्व शैशवावस्था 1 ते 2 वर्षे व उत्तर शैशवावस्था म्हणजेच बाल्यावस्था 3 ते 6 वर्षे असे भाग करता येतात. यात बालकाचे पूर्व प्राथमिक शिक्षण होते. पूर्व शैशवावस्थेमध्ये मुले पूर्णतः परावलंबी असतात, मुले स्वार्थी असतात. सर्व काही आपल्याचसाठी अशी त्यांची वृत्ती असते. घरात चार मुले जमली तर इतरांनी जे घेतले तेच मला पाहिजे. स्वतःची खेळणी ते इतर मुले नसताना कधी खेळत नसले तरी इतरांनी ती घेतल्याबरोबर मात्र ते खेळायला मागतात, इतरांनी आपल्यावर प्रेम करावे अशी त्यांची अपेक्षा

असते. त्यांचे मानसिक जीवन हळूहळू विकसित होत असते. भावनांचा अविष्कार ते शारीरिक कृतीच्या साह्याने करतात.

जसे-आनंदात हसणे, टाळ्या वाजवणे, राग आल्यास वस्तू फेकून देणे इ. कृती करतात. चार वर्षांपासून शैशवावस्थेतील मुले इतर समवयस्कांशी खेळायला लागतात. यात बाहुलीचा खेळ, एकत्र येऊन घर करण्याचा खेळ, गाडीगाडीचा खेळ इ. खेळ ते खेळतात. अशा प्रकारे त्यांचा सामाजिक विकास होतो. या वयातील मुले अतिशय निष्पाप असतात. त्यांच्या विविध मानसिक शक्तीचा विकास झपाट्याने होत असतो. घरातील, समाजातील, शेजाऱ्यांचे ते अनुकरण करून भाषा शिकत असतात. उत्तर किशोरावस्थेमध्ये मुलांचा भाषिक विकास चांगला झालेला असतो. विविध गोष्टी त्यांना कळायला लागलेल्या असतात. बाल्यावस्थेमध्ये किंवा उत्तर किशोरावस्थेमध्ये शारीरिक विकास झपाट्याने होत असतो. पूर्व शैशवास्थेतील एकदम परावलंबी असलेले मूल उत्तर शैशवावस्थेमध्ये हळूहळू स्वतःची कामे स्वतः करायला लागते.

शैक्षणिक महत्त्व

पूर्व शैशवावस्थेमध्ये मूल कुटुंबातील व्यक्तीचे अनुकरण करतच विविध गोष्टी शिकत असते बोलायला शिकणे, जसे : सुरुवातीला मामा, नाना, आई, बाबा इ. उकार वेलांटी, नसलेले शब्द शिकते. भिंत्तीच्या आधारे किंवा कोणालातरी धरून चालायला लागते, विविध खेळणीच्या साह्याने खेळ खेळते. म्हणजेच यामध्ये सुरुवातीला मूल परावलंबी असते. कुटुंब ही त्याची शाळा असते. आई-वडील व कुटुंबातील इतर व्यक्ती हेच शिक्षक असतात. यामध्ये मूल चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असते. तुम्ही त्याला जसे घडवाल तसे ते घडते. त्यामुळे कुटुंबातून चांगले संस्कार त्याला मिळणे गरजेचे असते.

उत्तर शैशवावस्थेमध्ये किंवा बाल्यावस्थेमध्ये मूल चालणे, बोलणे, विविध खेळ खेळणे, समवयस्कात राहणे त्याला आवडते. आणि याच वयात ते पूर्व प्राथमिक शिक्षण घेत असते. जसे क्रीडा गट, अभ्यास गट किंवा बालवाडी, अंगणवाडी अशा वर्गात ज्युनियर के.जी. सिनीयर के.जी. इ. मध्ये जाते’ या वेळी मुलाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होत असतो. त्यामुळे शाळेत त्याला जास्त वेळ बसवता कामा नये. कारण ते लवकर थकते.

➡️या वयात त्याला अनौपचारिक शिक्षण असावे, तासिका छोट्या छोट्या असाव्यात.

➡️या वयातील शिक्षणात त्यांना विविध खेळ शिकवणे, बडबड गीतेशिकवणे आवश्यक असते.

➡️या वयातील मुलांचा खेळावर जास्त भर असतो त्यामुळे इतरशिक्षणाची त्यांच्यावर सक्ती करू नये.

➡️या वयात मुले अतिशय जिज्ञासू असतात ती सतत प्रश्न विचारतअसतात. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे समाधानकारक द्यावीत.

➡️या वयात मुलांना चांगल्या सवयी लावाव्यात कारण याच सवयीचा परिणाम त्यांच्यावर होत असतो.

3. किशोरावस्था: (6 ते 12 वर्षे)

या अवस्थेमध्ये मुले प्राथमिक वर्गात जात असतात. या अवस्थेचे आपणास दोन भाग करता येतात. पूर्व किशोरावस्था (6 ते 9) उत्तर किशोरावस्था (9 ते 12) या वयामध्ये मुलांचा खेळण्यावर जास्त भर असतो. खेळताना थकल्याची सुध्दा जाण राहत नाही. यामध्ये धावणे, लिहिता येणे, वाचता येणे, कल्पना करणे, वस्तू ओळखणे इ. कृती करतात. मेंदूचा विकास जवळपास झाला असल्याने बरीच बौध्दिक कामे ते करतात. त्यातून त्यांचा आणखी बौध्दिक विकास होत असतो. शैक्षणिक काळ 1 ली ते 7 वी (प्राथामिक शिक्षण) शारीरिक विकासाचा विचार करता त्यांचे उंची, वजनही वाढलेले असते. दुधाचे दात जाऊन पक्के दात येत असतात. हृदयाचा झपाट्याने विकास होत असतो. सतत खेळणे, उड्या मारणे, लटकणे, झाडावर चढणे. म्हणजेच सतत काहीतरी उपद्व्याप ही मुले करत असतात. श्वसन, पचन, रक्ताभिसरण इ. संस्था कार्यक्षम होत असतात. त्यातून शारीरिक विकास होत असतो. या वयामध्ये मुलांचे वेगवेगळे गट तयार होतात. त्यातून सामाजिक व भावनिक विकास होतो. सुरुवातीला घर आणि शाळा यांचे समायोजन होत नाही. मात्र आत्मविश्वास वाढून ही मुले शाळेत रमायला लागतात. या वयात जात, धर्म, गरीब, श्रींमत, उच्च, निच असा भेदभाव त्यांच्यामध्ये नसतो.

या वयातील मुलांच्या मेंदूचा विकास 85% झालेला असतो त्यामुळे मानसिक विकास झपाट्याने होत असतो. स्मरण, अवबोध, अवधान, निरीक्षण, विचारशक्ती इत्यादी मानसिक प्रक्रियांचा विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो.

या वयातील मुलांचा भावनिक विकास चांगल्या पध्दतीने झालेला असतो. सहकार्य, प्रामाणिकता, नैतिकता इत्यादीमधून त्यांच्या भावना व्यक्त होतात. त्यांना समज आलेली असते. कथा, मालिका, चित्रपट, प्रसंग यांच्याशी ते एकरूप होतात. भावनेमध्ये हळवेपणा येतो.

शैक्षणिक महत्त्व

किशोरावस्थेमध्ये शारीरिक विकास समतुल्य असल्याने त्यात स्थिरता आलेली असते. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणापेक्षा वेगळ्या शिक्षणाची येथे गरज असते.

संघप्रवृत्ती विद्यार्थ्यांत वाढत असतात. या वयातील विद्यार्थी विविध गटागटाने राहतात. त्यासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास साधला पाहिजे –

जसे: वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून हा कलाविष्कार त्यांना करण्याची संधी दिली पाहिजे.

➡️या वयातील विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, श्रवण या भाषिक क्षमतांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते.

➡️या वयात शिक्षक हे आदरणीय असतात त्यामुळे मुले शिक्षकाचे अनुकरण करत असतात. शिक्षकांनी त्यांच्यापुढे आपल्या कृतीतून चांगला आदर्श ठेवावा.

➡️या वयाच्या मुलांच्या अध्ययनात कृतिप्रधानतेवर भर द्यावा. जसे त्यांच्याकडून प्रयोग करून घेणे, अध्ययनामध्ये त्यांचा कृतियुक्त सहभाग घेणे, लेखन करून घेणे, शैक्षणिक साहित्याचा वापर करून घेणे महत्त्वाचे असते.

➡️विद्यार्थ्यांच्या इच्छा, आकांक्षा, आवड, मानसिकता इ. चा विचार करून अध्यापन करावे.

➡️चांगले संस्कार होण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके द्यावीत.

4. कुमारावस्था (12 ते 18) (Adolescence)

या अवस्थेलाच कौमार्यावस्था, पौगंडावस्था असेही म्हणतात. किशोरावस्थेला व प्रौढवस्थेला जोडणारा कालखंड म्हणजे

कुमारावस्था होय. Adolescence म्हणजे वाढणे किंवा वयात येणे असा याचा अर्थ होतो. म्हणजेच शारीरिक बदलाची, मानसिक गोंधळाची अशी ही अवस्था असते. या अवस्थेपासून यौवनाची चाहूल लागलेली असते. या अवस्थेमध्ये शारीरिक, भावनिक, सामाजिक, मानसिक स्थित्यंतरे लवकर होतात आणि त्यामुळे वर्तनात अस्थिरता येते. भावना, आचार-विचार यांच्यामध्ये खळबळ माजते, समायोजन कठीण होऊन बसते आणि म्हणूनच या अवस्थेला मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणाचा काळ म्हणतात.

शैक्षणिक काळ 6 वी ते 12 वी असा आहे. म्हणजेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ही मुले घेत असतात. कुमारावस्थेतील शारीरिक विकास हा झपाट्याने होत असतो. त्यांच्यामध्ये जैविक व शारीरिक असे स्पष्ट बदल झालेले दिसतात आणि म्हणूनच कुमार किंवा कुमारिका प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. मुलांऐवजी मुलींमध्ये अगोदर शारीरिक पक्वता येते. यातूनच परलिंगी आकर्षण निर्माण होते. अंतस्त्राव ग्रंथीतील महत्त्वाच्या बदलामुळे शरीराच्या रचनेत, बांध्यात, आकारमानात ठळक व उठावदार बदल दिसतात. त्यातून विषमलिंगी शारीरिक आकर्षण निर्माण होते, मुले पुरुषीपणाकडे तर मुली खीत्त्वाकडे झुकतात. या अवस्थेत आवाज, उंची, वजन यात बदल होतो.

मानसिक विकासामध्ये संवेदना, अवबोध, स्मरण, कल्पना, अवधान, अभिरूची इ. मानसिक प्रक्रियांचा विकास होतो. अमूर्त कल्पना कुमारांना कळायला लागतात. कुमार आदर्शाच्या शोधात असतात.

स्वतः इतरांपेक्षा उठून दिसावे म्हणून त्यांची धडपड असते. समवयस्कांपुढे वयस्कांचा उपदेश ऐकण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. प्रौढाप्रमाणे आपणाला स्वातंत्र्य मिळावे असे कुमारांना मनोमन वाटते.

भावनिक विकास हा अस्थिर असतो. यात मुले अस्थिर व भावपूर्ण जीवन जगत असतात. त्यातून त्यांचा स्वभाव मुडी बनत जातो. त्यांची वृत्ती चिडखोर होते. एकाचा राग ते दुसऱ्याजवळ काढतात. त्यातून स्वभाव भित्रा बनतो, हळवा बनतो. मनाप्रमाणे जीवन जगता येत नसल्याने ही मुले सतत चिंताग्रस्त असतात.

या वयातील मुले समान आवड, अभिरूची, समान मूल्य यानुसार मैत्री करतात. त्यातून त्यांचा सामाजिक विकास होत असतो. ते आपल्या आवडत्या व्यक्तीचे पूजक व अनुयायी बनतात. याच वयामध्ये जीवापलीकडे प्रेम करणे, त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणे त्यातून प्रेम प्रकरणे उद्भवतात. आपल्या समवयस्कांचीच मते त्यांना पटतात.

शैक्षणिक महत्त्व

कुमारावस्थेमध्ये वर्तन अस्थिर असते. आचार विचारात खळबळ असते त्यामुळे शिक्षकांनी, पालकांनी काय योग्य, काय अयोग्य हे मुलांना समजावून द्यावे.

शारीरिक बदल मोठ्या प्रमाणात व ठळकपणे होत असल्याने या वयात दमन आणि द्वंद्व निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी नैसर्गिक असे बदल आहेत हे समजावून देऊन मार्ग काढावेत.

➡️ही मुले भावपूर्ण जीवन जगतात त्यातून चिंताग्रस्त, हळवी, भित्री बनतात. त्यांच्यातील भावनिक संघर्ष कमी केला पाहिजे.

➡️विविध मानसिक प्रक्रियांचा या वयात चांगला विकास झालेला असतो. त्याचा शिक्षकाने कौशल्याने उपयोजनात्मक विचार केला पाहिजे.

➡️कुमारांच्या विविध समस्या शिक्षक-पालकांनी चर्चा करून सोडवल्या पाहिजेत. या मध्ये मुलावर दबाव आणू नये.

➡️कामवासनेला कला, क्रीडा यामधून मार्ग काढून दिला पाहिजे. त्यातून वाममार्ग टाळता येऊ शकतो.

➡️चांगल्या कामासाठी कुमारांना प्रेरित केले पाहिजे.

➡️कुमारांना त्यांच्या भावनांचा निचरा होण्यासाठी सहली, संमेलनाचे आयोजन करावे.

➡️त्यांच्यावर आपली मते न लादता लोकशाही पध्दतीचा वापर करावा.

➡️व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांच्या सभोवती वातावरण निर्माण करावे.

➡️कुमारांमध्ये एक प्रकारची शक्ती असते. त्या शक्तीचा वापर

➡️सत्कार्यासाठी करून घेणे गरजेचे आहे.

➡️त्यांच्यासंदर्भात निर्णय घेताना पालकांनी, शिक्षकांनी त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.

Related posts:

Leave a Comment