क्रियापद म्हणजे काय? क्रियापदाचे प्रकार व काही उदाहरणे marathi kriyapad udharne
क्रियापद म्हणजे काय क्रियापद व्याख्या ?
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा.
1. राम खोखो खेळतो.
2. सीता गाणे गाते.
3. महेश गावाला जातो.
4. ती पत्र लिहिते.
सांगतो, बोलतो, आणतो, खेळतो, पळतो, राहतो, मारतो, उघडले, लागली, पोहतो, उठतो, उजाडले, बसवते, सोडवले इ.
क्रियापदाचे प्रकार खालील प्रमाणे
१. सकर्मक क्रियापद
२. अकर्मक क्रियापद
३. द्विकर्मक क्रियापद
४. उभयविध क्रियापद
५. संयुक्त क्रियापद
६. सहाय्यक क्रियापद
७. प्रायोजक क्रियापद
८. शक्य क्रियापद
९. साधित क्रियापद
१०. सिद्ध क्रियापद
११. अनियमित क्रियापद
१२. भावकर्तुक / अकर्तुक क्रियापद
१३. करणरूप / होकारार्थी क्रियापद
1. सकर्मक क्रियापद
ज्या वाक्याचा अर्थपूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते,त्या क्रियापदाला त्या वाक्यातील सकर्मक क्रियापद असे म्हणतात.
➡️राम रावणास मारतो.
➡️आज भाऊबीज आहे.
2. अकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदाचा अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, त्यांना अकर्मक क्रियापदे असे म्हणतात.
➡️ती रस्त्यात पडली.
➡️अमर खोखो खेळतो.
3. द्विकर्मक क्रियापद
ज्या क्रियापदास दोन कर्म लागतात, त्यास द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात.
➡️आजीने नातवाला गोष्ट सांगितली.
➡️गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात.
4. उभयविध क्रियापद
जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते, त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात.
➡️तिने घराचे दार उघडले.
5. संयुक्त क्रियापद
धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात.
➡️घरासमोर मुले खेळू लागली.
6. सहाय्यक क्रियापद
जेव्हा धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधिताला मदत किंवा साहाय्य करणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात.
➡️रवी सकाळी खेळत असतो.
➡️पक्षी गाणे गाऊ लागले.
7. प्रयोजक क्रियापद
जेव्हा कर्ता ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्या कोणालातरी करावयास लावीत आहे असा अर्थ व्यक्त होतो, त्या क्रियापदास प्रायोजक क्रियापद असे म्हणतात.
➡️त्याने त्याच्या मित्राला बंद खोलीतून सोडविले.
➡️मातोश्री जिजाबाईंनी छत्रपती शिवरायांना घडविले.
8. शक्य क्रियापद
वाक्यामधील ज्या क्रियापदाद्वारे कर्त्याच्या ठिकाणी क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते, त्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात.
➡️त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते.
➡️आता राज अक्षर गिरवतो.
9. साधित क्रियापद
विविध जातींच्या शब्दांपासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू असे म्हणतात व अशा साधित धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदांना साधित क्रियापद असे म्हणतात.
➡️माझ्या घरातील वस्तू तो नेहमी हाताळतो.
➡️रस्त्यात भीक मागणाऱ्या लहान मुलाला पाहून माझे डोळे पाणावले.
10. सिद्ध क्रियापद
या, जे, कर, उठ, बस असे जे मूळचे धातू आहेत त्यांना सिद्ध धातू असे म्हणतात व या धातूंना प्रत्यय लागून तयार होणाऱ्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात.
➡️आम्ही सकाळी लवकर उठतो.
➡️बाळ शांत निजला.
11. अनियमित क्रियापद
मराठीत काही धातू असे आहेत त्यांना काळाचे व अर्थाचे सर्व प्रत्यय न लागता ते थोड्या वेगळ्याच प्रकारे चालतात, त्यांना अनियमित क्रियापद असे म्हणतात.
➡️स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे.
➡️असे वागणे बरे नव्हे.
12. भावकर्तुक क्रियापद
जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्यांचा कर्ता मानावा लागतो, अशा क्रियापदांना भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात.
➡️मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.
➡️मुंबईला जाताना पोहोचण्यापूर्वीच उजाडले.
13. करणरूप क्रियापद /होकारार्थी क्रियापद
वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असेल तर त्याला होकारार्थी क्रियापद म्हणतात.
➡️मी सकाळी नियमित व्यायाम करते.
➡️सर्वांनी वृक्षारोपण करावे.









