TET PYQ मानसशास्त्र बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test pyq 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET PYQ मानसशास्त्र बहुपर्यायी प्रश्नसंच teacher eligibility test pyq 

धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे?

(1) पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही.

(2) धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते.

(3) धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते.

(4) अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

प्रत्येक बालक हे वेगळे असून, ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात?

(1) साधर्म्याचा नियम

(2) विविधतेचा नियम

(3) परागमनाचा नियम

(4) पुनरावृत्तीचा नियम

वरील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो?

(1) स्वभाव व वृत्ती

(2) पक्वतेचे वय

(3) बुद्धिमत्ता

(4) डोळ्यांचा व शरीराचा रंग

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरुपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे?

(1) संवेदना ही फरक आंतरिक प्रक्रिया आहे.

(2) आपली इच्छा असेल तरच संवेदना होते.

(3) संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते.

(4) संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरणरुप व्यापार आहे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

हरवलेले नाणे शोधतांना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो, चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रियभ्रम दोषामुळे होते ?

(1) परिचितता

(2) भौमितिक इंद्रियभ्रम

(3) विशिष्ट मनःस्थिती

(4) विशिष्ट भौतिक परिस्थिती

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

ज्ञानेंद्रिय उद्दीपीत न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे?

(1) प्रतिमा स्थिर असतात.

(2) प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते.

(3) पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही.

(4) सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

अध्ययनार्थ्यांना कल्पनाविकाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे?

अ) दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करुन घ्यावे.

ब) खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयल करावा.

क) वाद्यवादन करून घ्यावे.

ड) प्रदर्शन मांडणी करुन घ्यावी

(1) अ, ब, क फरक

(2) अ, ब, ड फक्त

(3) अ, ब, क, ड सर्व

वरील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

दोन घटना एकामागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. परीक्षेला जातांना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते?

(1) प्रतिकूल ग्रह

(2) काकतालीय न्याय

(3) इच्छानुगामी विचार

(4) निरीक्षणातील दोष

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे?

(1) पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही.

(2) धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते.

(3) धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते.

4) अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे?

(1) विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे.

(2) स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत.

(3) धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी

(4) धारणा जितकी जास्त तितके विस्मरण कमी.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

(1) विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे.

(2) आंतरिक प्रेरणा व अभिरूची यांचा निकटचा संबंध आहे.

(3) प्रोत्साहन आंतरिक प्रेरणा आहेत.

(4) अभिरूची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

स्पिअरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?

(1) प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो.

(2) प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो.

(3) क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो.

(4) विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.” ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली?

(1) अल्फ्रेड बीने

(2) डेव्हीड वेश्वर

(3) पीटर सॅलोव्ही

(4) हॉवर्ड गार्डनर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

 

Related posts:

Leave a Comment