दि.२ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ राबविण्याबाबत sadhna saptah paripatrak
विषय: दि.२ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ राबविण्याबाबत.
महोदय/महोदया,
भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल, २०२६ या कालावधीत ‘साधना सप्ताह’ आयोजित करण्याच्या सूचना केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. (पत्रांची प्रत सोबत जोडली आहे). त्यास अनुसरुन राज्यामध्ये प्रस्तुत कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या (GOT पोर्टलवरील आकडेवारीच्या आधारे) खालील कार्यालय प्रमुखांना मे, २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या “TECH-वारी २.०” या कार्यक्रमावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे:-
अ) मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे सचिव/प्रधान सचिव/अपर मुख्य सचिव (खुद्द विभाग अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालये)
ब) विभागीय आयुक्त (विभागीय आयुक्त कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालये विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हापरिषदा)
०२. साधना सप्ताहाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:-
अ) सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी IGOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्सेस करावेत. पूर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान ४ तास असावा. (GOT पोर्टलवरील आकडेवारीनुसार)
च) सदर कोर्सेस दि.२ एप्रिल ते दि.८ एप्रिल, २०२६ या कालावधीत पूर्ण करावेत.
क) आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरीता सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
राज्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सक्रियरित्या सहभागी व्हावे, ही विनंती.










