खरीप हंगाम-2026 मधील Trigger 1 (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही करुन अहवाल सादर करणेबाबत सुधारित सुचना kharip hangam dushkal report

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खरीप हंगाम-2026 मधील Trigger 1 (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही करुन अहवाल सादर करणेबाबत सुधारित सुचना kharip hangam dushkal report 

संदर्भ : 1. मदत व पुर्नवसन विभागाकडील शासन निर्णय क्र. समिती -2026/प्र.क्र.82/ मदत-2 दि. 25 सप्टेंबर 2026 2. कृषी आयुक्तालयाचे पत्र क्र. कृआ/विप्र-1/ने.आ./खरीप दुष्काळ/प्र.क्र.24/467, दि. 26/9/2026

संदर्भीय शासन निर्णयानुसार सन २०२६ च्या खरीप हंगामातील Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या 265 तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार संदर्भीय पत्र क्र.2 अन्वये शा.नि.क्र. संकीर्ण-2017/प्र.क्र.173/2017/म-7 दि. 28 जून 2018 नुसार प्रपत्र कै मध्ये अहवाल संकलन करणेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.

तथापि, या प्रपत्राच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरून विचारणा झाल्यानुसार मा. सचिव (कृषी) व मा. अपर मुख्य सचिव (मदत व पुर्नवसन) यांचे चर्चे नुसार दिलेल्या निर्देशानुसार पंचनाम्यासाठी क्षेत्रीय स्तरावर उपयोगात असलेले सोबत जोडलेल्या सुधारीत प्रपत्रात Trigger-1 (प्रथम कळ) तालुक्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही करण्यात यावी. यामध्ये AgiStack Farmer ID घेण्यात यावी. शेतकऱ्याची Farmer ID उपलब्ध नसल्यास UID/आधार क्रमांक संकलित करण्यात यावा. पंचनाम्याबाबतचा संकलित अहवाल विहित अ, ब, क, ड प्रपत्रात विभागीय आयुक्तांमार्फत कृषी आयुक्तालयास agriexten@gmail.com या ईमेल वर यथाशीघ्र सादर करण्यात यावा.

सोबत – सुधारीत प्रपत्र आयुक्त कृषि, म. रा.यांच्या मान्यतेने

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment