साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छोटे मराठी भाषण lokshahir annabhau sathe jayanti
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग तसेच येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती….
१) सर्वांना माझा नमस्कार,
२) माझे नाव राज पाटील आहे.
३) आज मी आपणासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे.
४) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक व लेखक होते.
५) त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला
६) त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते.
७) त्यांनी न शिकता अनेक कथा, कादंबऱ्या. लावण्या व पोवाडे लिहिले.
८) त्यांनी आपल्या लेखनातून गरीब, शोषित, कामगार यांचे प्रश्न मांडले
९) त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या फकीरा ही त्यांची गाजलेली कादंबरी होय.







