पवित्र (PAVITRA – Portal For Visible To all Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीव्दारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या आश्रमशाळा तसेच विदयानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीबाबत
संदर्भ- शासन पत्र क्रमांक विभशा-२०२५/प्र.क्र.७३/ विजाभज १ दिनांक ३ डिसेंबर २०२५
विषयांकित प्रकरणी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या धर्तीवर विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विदयानिकेतन विजाभज आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पवित्र (Pavitra Portal) या संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करणेबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
त्याअनुषंगाने सर्व प्रादेशिक उपसंचालक, सहायक संचालक व आश्रमशाळांना Login (User name, Passward) उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या प्रपत्र अ व ब मधील माहिती तात्काळ संचालनालयास सादर करावी.











