राज्यातील सर्व शाळांचे “Maha School GIS” अॅपवर जिओ टॅगिंग करणेबाबत
संदर्भ:-
१. शिक्षण आयुक्तालयाचे क्र. आशिका /२०२५/Geo tagging/इंगव्ह-१४३, दि.१९/१२/२०२५ रोजीचे पत्र
२. शिक्षण आयुक्तालयाचे क्र. आशिका/२०२५/एमआरसेंक/ईगव्ह-१४३. दि. १९/१२/२०२५ रोजीचे पत्र
३. शासन परिपत्रक क्र. ईगव्ह-२०२५/प्रक्र७/सगणक, दिनांक २३/०४/२०२५ रोजीचे पत्र
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये “Maha School GIS” अॅपवर जिओ टॅगिंग करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी सोबत जोडलेल्या विविरणनुसार अद्यापही राज्यातील एकुण २२१८ शाळा “Maha School GIS” अॅपवर जिओ टॅगिंग न झालेले दिसत आहेत. करीता संबंधित सर्व शिक्षणाधिकारी सर्व, संबंधित अधिक्षक वेतन पथक (प्राथ / माध्य) सर्व यांनी आपल्या जिल्हयातील मुख्याध्यापक यांना सुचित करून प्रलंबित “Maha School GIS” अॅपवर जिओ टॅगिंग करणेबाबतची कार्यवाही दि. १३/५/२०२६ रोजी पर्यंत पूर्ण करावी.
सोबत प्रलंबित शाळा यादी.











