TET उभयान्वयी अव्यय सराव प्रश्नसंच tet practice questions
1. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना असे म्हणतात.
(1) शब्दयोगी अव्यय
(2) उभयान्वयी अव्यय
(3) समास
(4) संधी
2. त्याने रजा घेतली पण तो गावी गेलाच नाही.
अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
(1) सर्वनाम
(2) क्रियाविशेषण
(3) उभयान्वयी अव्यय
(4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 3
3. ‘यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
(1) समुच्चयवोधक
(2) संकेतबोधक
③ विकल्पबोधक
(4) परिणामबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 1
4. विक्रम शाळेत जाणार होता परंतू खुप पाऊस पडल्यामुळे तो जाऊ शकला नाही. यातील ‘परंतू’ हे काय आहे?
(1) शब्दयोगी अव्यय
(2) उभयान्वयी अव्यय
(3) केवलप्रयोगी अव्यय
(4) विशेषण
उत्तर पर्याय क्रमांक 2
5. ‘आम्ही राजन गवस यांची पुस्तके वाचली आणि चित्रपटही पाहिला.’ यातील आणि हे आहे.
(1) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय
(2) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
(3) कारणबोधक उभयान्वयी अव्यय
(4) स्वरुपबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 2
6. तुला ज्ञान हवे की धन हवे. (अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा ).
(1) समुच्चयबोधक
(2) विकल्पबोधक
(3) न्यूनत्वबोधक
(4) परिणामबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 2
7. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय आलेले नाही?
(1) त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.
(2) मृग निघाला आणि पाऊस सुरू झाला.
(3) सुर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले.
(4) एक तास म्हणजे साठ सेकंद.
उत्तर पर्याय क्रमांक 3
8. खालील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा गट कोणता?
(1) व, शिवाय, आणि, आणखी
(2) अथवा, किंवा, की, वा
(3) किंतू, पण, बाकी, परंतु
(4) म्हणून, यास्तव, सबब, अतएव
उत्तर पर्याय क्रमांक 2
9. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना असे म्हणतात.
(1) शब्दयोगी अव्यय
(2) उभयान्वयी अव्यय
(3) समास
(4) संधी
उत्तर पर्याय क्रमांक 2
10. ‘मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला.’ या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा ?
(1) समुच्चयबोधक
(2) न्यूनत्वबोधक
(3) विकल्पबोधक
(4) परिणामबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 4
11. खालीलपैकी न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कोणते ?
(1) किंतु
(2) अथवा
(3) अन्
(4) म्हणून
उत्तर पर्याय क्रमांक 1
12. ‘किंवा, अथवा, वा, की ही आहेत.
(1) समुच्चयबोधक
(2) गौणत्वसूचक
(3) विकल्पबोधक
(4) न्यूनत्वबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 3
13. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा: ‘किंवा’, ‘अथवा’, ‘वा’, ‘की’ ही उभयान्वयी अव्यये आहेत.
(1) समुच्चयबोधक
(2) परिणामबोधक
(3) विकल्पबोधक
(4) न्यूनत्वबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 3
14. एक रुपया म्हणजे शंभर पैसे. यातील ‘म्हणजे ‘ हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे?
(1) स्वरुप बोधक
(2) कारणबोधक
(3) उद्देश बोधक
(4) संकेतबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 1
15. ‘आणि’ या शब्दाची जात ओळखा.
(1) शब्दयोगी अव्यय
(2) क्रियापद
(3) उभयान्वयी अव्यय
(4) नाम
उत्तर पर्याय क्रमांक 3
16. ‘माझा पहिला क्रमांक आला, की मी पेढे वाटीन’ वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
(1) विकल्पबोधक
(2) स्वरूपबोधक
(3) परिणामबोधक
(4) संकेतबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 4
17. खालील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते, लढत राहणे किंवा हार पत्करणे.
(1) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
(2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
(3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
(4) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 2
18. ताईला घ्यायला मी येईन अथवा दादा येईन ?
उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
(1) समुच्चयबोधक
(2) परिणामबोधक
(3) विकल्पवोधक
(4) स्वरूपबोधक
उत्तर पर्याय क्रमांक 3
19. ‘मरावे परी कीर्तिरूपी उरावे’ या वाक्यातील अधोरेखित शब्द हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
(1) शब्दयोगी अव्यय
(2) उभयान्वयी अव्यय
(3) केवलप्रयोगी अव्यय
(4) यापैकी नाही.
उत्तर पर्याय क्रमांक 2
20. मराठी भाषेमध्ये ‘आणि, व, किंवा, अथवा’ हे शब्द सामान्यतः म्हणून वापरले जातात.
(1) उभयान्वयी अव्यय
(2) सर्वनाम
(3) केवलप्रयोगी अव्यय
(4) क्रियाविशेषण अव्यय
उत्तर पर्याय क्रमांक 1










