वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाबाबत varishtha vetan nivad shreni training
संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि. १७/०४/२०२६.
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) दि.०७/०५/२०२६.
उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येत आहे की, संदर्भीय पत्र क्र. १ नुसार दि. २० एप्रिल २०२६ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्र शिक्षकांची नावनोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. संदर्भ क्र. २ अन्वये या नावनोंदणी प्रक्रियेसाठी दि. १२ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
दरवर्षी सदरील प्रशिक्षणाचे नियोजन माहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र भारताची जनगणना २०२७चा पहिला टप्पा दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालवधीत नियोजित आहे. या राष्ट्रीय कार्यासाठी (घरगणना) बहुतांश शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे सदरील प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ मध्ये दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरु आहे.
माहे जून २०२६ ते माहे ऑक्टो. २०२६ या कालावधीत सेवेची १२/२४ वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त होणाऱ्या व पोर्टलवर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण माहे नोव्हें. २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत पडताळणी सुरु आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना आपल्या स्तरावरून ही बाब निदर्शनास आणून द्यावी.











