विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत promotion paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत promotion paripatrak

संदर्भ :-

१. मा.उच्च न्यालालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २७८५/२०२६,२७३७/२०२६ मधील निर्णय दिनांक २९/०४/२०२६

२. मा. उच्च न्यालालय मुंबई येथील याचिका क्रमांक ६३९१/२०२६ मधील आदेश दिनांक ०६/०५/२०२६

३. मा. उच्च न्यालालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक २६०६/२०२६ मधील आदेश दिनांक २५/०३/२०२६

४. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक दिनांक ०८/०५/२०२६

मा. सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन-इशात-ए-तालीम या प्रकरणी शिक्षकांना पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. याबाबत राज्यातील शिक्षकांकडून मा. उच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये विवध न्यायनिवाडयामध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. (मा. उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशाच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.)

यास्तव शिक्षकाची विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती करताना सेवाज्येष्टतेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीसाठी विचारात घेण्यात यावे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही सुरू आहे. पदोन्नती करताना सेवा जेष्ठता-नि-गुणवत्ता आधारे पदोन्नती करण्यात येते परंतू शिक्षकांना पुढील पदावर पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा (TET-MAHATET/CTET) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्यामुळे पदोन्नतीसाठी जेष्ठतेसह ही पात्रता देखील तपासणे आवश्यक आहे.

सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक ०१/०९/२०१९ अन्वये पदोन्नतीसाठीच्या तरतूदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यातील ५.१.३ मध्ये निम्न संवर्गातील किमान सेवेची गणना करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे, त्यानुसार प्रतिवर्षी निवड सूची वर्षाच्या (सध्या २०२५-२६ निवडसूची वर्ष पहिल्या तारखेस म्हणजेच दिनांक १ सप्टेंबर या तारखेस (म्हणजेच दिनांक ०१/०९/२०२५ रोजीची विचार क्षेत्रातील कर्मचारी यांची निम्न पदावरील किमान सेवा तसेच पदोन्नतीसाठीची इतर आवश्यक अर्हता पूर्ण झाली पाहिजे अशी तरतूद आहे.

तसेच दिनांक ०१/०९/२०२५ रोजी अर्हता धारक कर्मचारी विचारात घेतल्यानंतर पदोन्नतीची पदे रिक्त रहात असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास निम्न पदावरील किमान सेवेची अट पूर्ण करणाऱ्या व पदोन्नतीसाठीची इतर आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या कर्मचारी यांचा विचार करण्याबाबत तरतूद आहे.

उक्त शासन निर्णयातील ५.२ मध्ये सेवाज्येष्ठता सूचीबाबत तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार ज्या पदावर पदोन्नती द्यावयाची आहे त्या पदाच्या निम्नस्तरीय पदाची निवडसूची वर्षाच्या (सन २०२५-२६ निवडसूचीसाठी) लगतच्या वर्षाची (म्हणजेच दिनांक ०१/०१/२०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची तयार कराबी अशा तरतूद आहेत.

यावरून हे स्पष्ट होते की, सध्या निवड सूची वर्ष २०२५-२६ सुरु असून त्यासाठी ०१/०९/२०२५ रोजीची पात्रता विचारात घ्यावी लागेल व त्यासाठी दिनांक ०१/०१/२०२५ रोजीच्या ज्येष्ठता सूचीच्या आधारे पदोन्नतीची कार्यवाही करावी लागणार आहे. तसेच पदोन्नतीसाठी पदे शिल्लक रहात असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकास अर्हता धारण करणारे कर्मचारी यांना विचारात घेवून रिक्त राहणाऱ्या पदांवर पदोन्नतीची कार्यवाही करता येईल अथवा पुढील वर्षाच्या निवड सुचीनुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल.

वरील प्रमाणे शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही करताना उतरत्या क्रमाने शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक याप्रमाणे केल्यास त्या त्या गटातील पदे रिक्त होवून जास्तीत जास्त पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होवून पदोन्नतीची रिक्त पदे भरली जातील व पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. सदर पदोन्नतीची कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास खालची शिक्षकांची पदे रिक्त होतील त्यामुळे रिक्त होणारी पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या सारखी अध्यापकीय पदे पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीची कार्यवाही पूर्ण करता येईल.

काही जिल्हा परिषदामधील पदोन्नतीबाबत मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यामध्ये वेळीच शपथपत्र दाखल करून याचिका निकाली काढून त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल. याबाबत शासकिय विधिज्ञ/जिल्हा परिषदांचे वकील यांचेशी संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करावी.

शासन निर्णय pdf download

वरील बाबी विचारात घेवून शिक्षकांच्या पदोन्नतीची कार्यवाही मा. न्यायालयाचे आदेश व प्रचलित तरतूदी विचारात घेवून पदोन्नतीची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यबाहीचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी संचालनालयास अहवाल सादर करण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment