शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ – प्रथम टप्प्यातील १० टक्के राखीव पदांबाबत निर्णय shikshak abhiyogyata chachni 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ – प्रथम टप्प्यातील १० टक्के राखीव पदांबाबत निर्णय shikshak abhiyogyata chachni 

संदर्भ: १. रिट याचिका क्र. ३२०३/२०२५ (मधुबाला भरतनाथ यादव विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने पारीत केलेला दि. ०४.०२.२०२६ रोजीचा न्यायनिर्णय.

२. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. ६६१/टीएनटी-१, दि. १०.०९.२०२४.

महोदय,

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ च्या आधारे करण्यात आलेल्या शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सर्व प्रवर्गाची १० टक्के पदे राखीव ठेवण्यात आली होती. प्रथम सर्वसाधारण यादी प्रसिध्द केल्यानंतर समांतर आरक्षणाची पदे संबंधित प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण वर्गवारीत रुपांतरीत करण्यात आली. तथापि, माजी सैनिक या समांतर आरक्षणातील १० टक्के पदे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाच्या सूचनेनुसार राखीव ठेवण्यात आली.

२. उपरोक्तप्रमाणे राखून ठेवण्यात आलेली पदे प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून भरण्याबाबत शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. प्रतिक्षा यादीतील एका उमेदवारांने दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणात मा. उच्च न्यायालयाने संदर्भ क्र. १ येथील न्यायनिर्णयान्वये खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत :-

अ) सदर न्यायनिर्णयातील परि. क्र. १८ मध्ये मा. उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला असे निर्देश दिले आहेत की, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२२ परीक्षेच्यावेळी रिक्त असलेल्या जागांवर नियुक्तीसाठी याचिकाकर्त्यासारख्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा.

ब) मा. उच्च न्यायालयाने परि. क. २० अन्वये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्तांसाठी राखीव असलेल्या पदांच्या रुपांतरणाची कार्यवाही जर त्यात काही अन्य कायदेशीर अडचणी नसतील तर शासन करेल.

३. संदर्भ क्र. २ येथील शासन पत्रान्वये विषयांकित प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या होत्या :-

१) बिंदुनामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हापरिषदांकडून शहानिशा करून १० टक्के रिक्त पदभरतीबाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीमध्ये रिक्त १० टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा.

२) भरती प्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे.

३) महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दि. २६.०२.२०२४ पासून लागू झाल्यामुळे नव्याने येणाऱ्या जाहिरातींमध्ये एसईबीसी या प्रवर्गाकरीता विहित आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देणेबाबत सूचना देण्यात आल्या.

४) आरक्षणातील बदल झाल्यामुळे एसईबीसी, इमाव या प्रवर्गासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या स्व प्रमाणपत्रात योग्य तो बदल करुन कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

४. वरीलप्रमाणे वस्तुस्थिती असली तरी प्रस्तावांतर्गत १० टक्के राखीव जागा प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांमधून भरण्यास खालीलप्रमाणे अडचणी निदर्शनास आल्या आहेत :-

१) शिक्षक पदभरतीचा पहिला टप्पा सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार राबविण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्याच्यावेळी सन २०२४-२५ च्या संचमान्यता निर्गमित झाल्या असल्याने त्या विचारात घेणे भाग होते. यामुळे उपलब्ध पदसंख्येत घट झाली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

२) शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्याच्यावेळी एसईबीसी आरक्षण अस्तित्वात नव्हते. तथापि, दुसन्या टप्प्याच्यावेळी हे आरक्षण लागू झाल्याने त्यानुसार बिंदुनामावली प्रमाणित करुन घेणे क्रमप्राप्त होते. १० टक्के राखीव जागांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला असला तरी बदललेल्या धोरणामुळे आरक्षणात बदल झाला आहे.

३) माजी सैनिक प्रवर्गातील १०० टक्के जागा रुपांतरीत करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्थ माजी सैनिक कल्याण विभागाने १० टक्के पदे राखीव ठेवण्याचे सूचित केल्याने ती पदे रुपांतरीत करता आली नाहीत. सन २०२५ च्या परीक्षेच्या आधारे केल्या जाणाऱ्या पदभरतीत ही पदे उपलब्ध होणार आहेत.

४) या विभागाच्या दि. १०.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये अशी तरतूद करण्यात आली आहे की, उमेदवारास प्रत्येकवेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्या पूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन

चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-२०२५ संपन्न झाली असून याचा निकाल दि. १८.०८.२०२५ रोजी प्रसिध्द होऊन जवळपास ८ महिने इतका कालावधी लोटला आहे. त्यामुळे सन २०२२ मधील परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे सन २०२६ मध्ये भरती करणे संयुक्तीक होणार नाही. तसेच प्रत्यक्षात ते शक्य देखील होणार नाही.

५) सन २०२२ मधील गुणवत्तेनुसार पदभरती झालेली आहे. आता सन २०२५ नुसार दि. ०१.०५.२०२६ पासून पवित्र पोर्टलवर नव्याने जाहिराती येत आहेत. सदर जाहिरातीसाठी टेट २०२५ परीक्षा दिलेले उमेदवार पात्र आहेत.

५. उपरोक्त अडचणी विचारात घेऊन विषयांकित १० टक्के पदे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांमधून भरता येणे शक्य नसल्याने ती न भरण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. सदर निर्णय सर्व संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात यावा.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment