इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ eleventh online pravesh
इयत्ता ११ वी चा प्रवेश निश्चित करताना इयत्ता १० वी उत्तीर्ण मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य न करणे बाबत.
संदर्भ:- दिनांक २९/०५/२०२६ रोजी जाहिर गुणवत्ता यादी.
सन २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. दिनांक २१/०५/२०२६ पासून प्रवेश प्रकियेच्या नियिमत फेरी ०१ ची सुरुवात करण्यात आली आहे. या फेरीमध्ये दिनांक २९/०५/२०२६ रोजी गुणवत्ता यादी जाहिर करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, इयत्ता १० वी राज्य मंडळाचा निकाल जाहिर झाला असून अद्याप मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या नाहीत. या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांना अलॉट केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रक अनिवार्य करण्यात येऊ नये. तसेच इयत्ता १० वी उत्तीर्ण गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यानंतर सादर करण्यात येईल असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून घ्यावे. गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल याबाबत जाणीव करून देण्यात यावी.
उपरोक्त सूचना आपल्या अधिनस्त सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात याव्यात.











