TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२६ प्रसिद्धी निवेदन teacher eligibility test
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२६
प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २८/०६/२०२६रोजी करण्यात येणार आहे.
सदर परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी, सिंधी माध्यमांच्या विद्यार्थी/उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येत आहेत. याची संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सोबतः कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्हयांची माहिती.










