समग्र शिक्षा अंतर्गत SNA Sparsh कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शालेय स्तरावरून Current Bank Accounts उघडणेबाबत sna current bank account
संदर्भ : 1. शालेय शिक्षा व साक्षरता मंत्रालय भारत सरकार यांचे दि.06.03.2026 चे पत्र.
2. या कार्यालयाचे दि. 13.03.2026 चे पत्र.
3. या कार्यालयाचे दि.30.04.2026 चे पत्र.
4. या कार्यालयाचे क्र. मप्राशिप/लेखा शाखा/2026-27/1737, दि. 12.05.2026 चे पत्र.
5. दि.27.05.2026 रोजीची व्हिडिओ कॉन्फरन्स,
उपरोक्त विषयानुरूप या कार्यालयाच्या संदर्भीय क्र.2 व 3 च्या पत्रान्वये SNA Sparsh कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने Current Bank Account उघडण्याच्या दृष्टिने आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी कळविण्यात आले आहे. तसेच दि.27.05.2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना समग्र शिक्षा अंतर्गत SNA Sparsh कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शालेय स्तरावरून Current Bank Account उघडण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे.
यानुरूप कळविण्यात येते की, समग्र शिक्षा अंतर्गत SNA Sparsh प्रणाली लागू करण्याकरिता 100% शाळांचे Current Bank Accounts व शाळांचे TAN No. असणे आवश्यक आहे. सोबत दि.27.05.2026 रोजीची जिल्हानिहाय Current Bank Account & TAN No. ची सद्यस्थिती जोडण्यात आली आहे. याबाबत नमूद करण्यात येते की, ज्या शाळांचे Current Bank Account & TAN No. नसेल अशा शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत SNA Sparsh कार्यप्रणाली अंतर्गत निधी वर्ग करणे शक्य होणार नाही.
तरी आपणास कळविण्यात येते की, समग्र शिक्षा योजना SNA Sparsh कार्यप्रणालीवर On Board करण्याच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शाळांचे Current Bank Account उघडणे व TAN
No. प्राप्त करून घेण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना निर्देश व्हावेत, जेणेकरून समग्र शिक्षा ही केंद्र पुरस्कृत योजना SNA Sparsh कार्यप्रणालीवर विहित कालावधीत On Board करणे शक्य होईल. तसेच सर्व शाळांना राज्य स्तरावरून निधी वर्ग करणे सुलभ होईल. सोबत SNA Sparsh कार्यप्रणाली अंतर्गत समग्र शिक्षा योजनेंतर्गत उघडण्यात आलेले Current Bank Account (Holding) व TAN बाबतची सद्यस्थिती (दि.27.05.2026) देण्यात आलेली आहे. तसेच याबाबत दि.08.06.2026 रोजी या कार्यालयाच्या स्तरावरून आयोजित करण्यात येणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत आपल्या अंतर्गत सर्व शाळांची SNA Sparsh कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यासाठी Current Bank Account (Holding) उघडण्याची व TAN प्राप्त केल्याची माहिती सादर करणे बंधनकारक राहील, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
सोबत : SNA Sparsh कार्यपद्धती अंतर्गत समग्र शिक्षा योजनेंतर्गत उघडण्यात आलेले Current Bank Account (Holding)
व TAN बाबतची सद्यस्थिती.











